Malad Garden Name Change : शिंदे फडणवीस सरकारने मविआला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. (State Tourism Minister Change Malad Garden Name)
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
मविआ सरकारच्या काळात मालाडमधील उद्यानाला देण्यात आलेलं टिपूसुलताचं नाव बदलण्यात आले आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत ट्वीट करत घोषणा केली आहे.
गेल्या वर्षी या उद्यानाचे नाव बदलण्यासाठी भाजपकडून मोठं आंदोलन करण्यात आले होते. या नावावरून खूप गदोरोळ झाला होता. मात्र, अखेर आज या उद्यानाला देण्यात आलेले टिपूसुलतानचे नाव बदलण्यात आले आहे. या बदलामुळे शिंदे-फडणवीस सरकारने मविआला आखणी एख धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मंगल प्रभात लोढा यांचे ट्वीट काय?
याबाबत मंगलप्रभात लोढा यांनी ट्वीट केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, अखेर आंदोलन यशस्वी...गेल्यावर्षी मविआ सरकार विरोधात सकल हिंदू समाजाने केलेले आंदोलन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा @iGopalShetty जी यांची मागणी लक्षात घेऊन, मविआ सरकारच्या काळात मालाड मधील उद्यानाला दिलेले टिपू सुलतानचे नाव, जिल्हाधिकारी कार्यालयास आदेश देऊन आम्ही हटवले!
नेमक प्रकरण काय?
ज्यावेळी या उद्यानाला टिपूसुलतानचे नाव देण्यात आले होते. त्यावेळी राज्यात मविआ सरकार अस्तित्वात होते. या नावावरून भाजपने आक्षेप घेत आंदोलन केले होते. तसेच शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आव्हान देण्यात आले होते.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मविआ काळातील अनेक निर्णण बदलत मोठे धक्के दिले आहेत.
त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने मालाडमधील उद्यानाला देण्यात आलेले टिपूसुलतानचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
या उद्यानाचे नाव बदलण्यासाठी करण्यात आलेल्या भाजपच्या आंदोलनात मंगलप्रभात लोढा आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर आज अखेर या उद्यानाचे नाव बदलण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.