MUMBAI SAKAL
मुंबई

Mumbai News : निलंबित अभियंत्याला राजकीय हस्तक्षेपामुळे इच्छुक पदी बदली; RTI मधून माहिती उघड

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील मलबार हिल पेडर रोड सारख्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या मुंबई महापालिकेच्या डी वॉर्डांत पोस्टिंगचा कल वाढलेला पाहायला मिळत आले. मुंबई महापालिकेच्या या हायप्रोफाइल वॉर्डांत गेले काही दिवसात 2 अभियंत्यांच्या बदल्या चर्चेत राहिल्या.

या 2 अभियंत्यांच्या बदल्या डी वॉर्डातून बाहेर करण्यात आल्या होत्या. परंतु अभियंत्यांनी राजकीय हस्तक्षेपामुळे बदल्या रद्द करून परत डी वार्डता रुजू करण्यात आले.

आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी डी वॉर्डमधील अभियंत्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत हा माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती विचारली होती. यावर प्रशासनाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलीकडेच जुलै 2022 मध्ये, डी वॉर्डच्या दोन अभियंत्यांना एसीबीने 1.9 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. धक्कादायक म्हणजे एसीबीने तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

बेकायदेशीर बांधकामास मदत केल्याबद्दल विलास येले यांना ऑगस्ट 2021 मध्ये निलंबित करण्यात आले होते. 29 एप्रिल 2022 रोजी त्यांची पाणीपुरवठा विभागात बदली झाली.

त्याऐवजी कांदिवली जवळच्या वॉर्डमध्ये बदली करण्याची मागणी करण्यासाठी येले यांनी वरिष्ठांना पत्र लिहिले.13 जुलै 2022 रोजी, मुंबई महापालिकेने स्वतःच्या नियमांनाचं उल्लंघन करून, नवीन आदेश देत विलास येले यांची इच्छे नुसार डी वॉर्ड मध्ये बदली झाली.

याच बदली आदेशातील आणखी एक उपअभियंता अमित पाटील असून तो 2015 मध्ये डी वॉर्डमध्ये असताना 9 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला होता.बदलीच्या आदेशानुसार, श्री अमित पाटील यांची 22 एप्रिल 2022 रोजी पुन्हा रस्ते विभागात बदली करण्यात आली, ते देखील पोस्टिंगवर रुजू झाले नाहीत आणि गैरहजर राहिले.

फाईल नोटींग्सनुसार त्यांनी नेहमीच वॉर्ड ऑफिसमध्ये काम केले असून त्यांची पुन्हा वॉर्ड मध्ये बदली करू नये असा नकारात्मक शेरा दिला.अखेरीस, पुन्हा बीएमसीने स्वतःचे नियम केराच्या टोकरीत टाकले आणि 13 जुलै 2022 रोजी बदली आदेशाद्वारे त्यांना डी वॉर्डमध्ये पोस्टिंग देण्यात आली.

"31 मार्च 2022 रोजी, बीएमसीने एक परिपत्रक जारी केले ज्यात अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये नवीन नियम आणि कायदे निश्चित केले गेले आहेत, दुर्दैवाने 4 महिन्यांच्या आत शहर अभियंता कार्यालयाने त्यांच्या बदल्या करण्याच्या परिपत्रकाचे उल्लंघन केले आणि या डागीत अभियंतांना 13 जुलै 2022 रोजी ड वॉर्डमध्ये पोस्ट केले.

प्रभागातील इमारत व कारखाना विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डा समजला जातो परंतु गंभीर बाब म्हणजे, भ्रष्ट अभियंत्यांनी संरक्षित केलेल्या बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामांमुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अशा विभागांमध्ये चांगले ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या अभियंत्यांची नियुक्ती करण्यावजी बीएमसी पैसा आणि राजकीय शक्तीं असलेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देत आहे. या प्रकरणात, या बदली घोटाळ्यात कोणाचा हात आहे हे शोधण्यासाठी उच्चस्तरीय विभागीय चौकशी आवश्यक आहे."

- जितेंद्र घाडगे, आरटीआय कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT