Mumbai News: पतीकडुन होत असलेल्या मानसिक, शारिरिक छळाला कंटाळुन घणसोलीतील तळवली भागात राहणाऱया एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणी मृत विवाहितेच्या पतीसह त्याच्या इतर तीन नातेवाईकांविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे.
या घटनेतील मृत विवाहितेचे नाव वर्षा किरण पवार (32) असे असून 2018 मध्ये तिचा विवाह घणसोलीतील तळवली भागात राहणाऱया किरण पांडुरंग पवार (35) याच्या सोबत झाला होता. लग्नाचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर किरण पवार याने वर्षाला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण करुन तिला सतत सोडचिठ्ठी देण्याची धमकी देण्यास सुरुवात केली होती. वर्षाला दिवस गेल्यानंतर वर्षाला तिच्या आई वडिलांनी माहेरी नेले.
त्यानंतर वर्षाला मुलगी झाल्यानंतर किरणला त्याबाबत कळवण्यात आले. मात्र त्याने मुलगी झाल्यामुळे वर्षाला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली होती. किरणच्या अशा वागण्यामुळे वर्षाला तिच्या आई वडिलांनी तिला तीन वर्षे माहेरी ठेवले. यादरम्यान किरण फक्त देन वेळेस वर्षाला भेटण्यासाठी गेला होता.
त्यादरम्यान देखील त्याने किरकोळ कारणावरुन भांडण करुन वर्षाला मारहाण केली होती. वर्षा तीन वर्षे माहेरी राहिल्याने किरणचा नातेवाईक बाळु अहिर याने वर्षाला सासरी पाठवण्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी नाशिक येथे दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईकांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत यापुढील काळात वर्षाला मारहाण व शिवीगाळ तसेच कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे किरण व त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
त्यानंतर वर्षा व तिच्या मुलीला किरणसोबत तळवली येथे पाठवून देण्यात आले होते. मात्र तीन चार महिन्यातच किरण पवार याने वर्षाला मुलीसह नाशिक चिचवे येथील त्याच्या घरी पाठवून दिले. सदर ठिकाणी वर्षा व तिची मुलगी फक्त दोघीच तीन महिने राहिल्या. त्याठिकाणी देखील किरण पवार याने वर्षाला मारहाण केली होती.
तसेच वर्षाला तिच्या मावशीच्या घरी दोन तीन दिवसासाठी नेऊन सोडले होते. मात्र सात आठ महिन्यानंतर देखील किरण वर्षाला घेण्यासाठी गेला नव्हता. किंवा तिची कोणत्याही प्रकारे विचारपुस केली नव्हती. त्यानंतर वर्षाच्या आई वडिलांनी नाशिकमधील जायखेड पोलीस ठाण्यात किरण पवार याच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केल्याने किरण पवार हा 20 दिवसानंतर वर्षाला घेण्यासाठी गेला.
त्यानंतर त्याने वर्षाला सोबत नेल्यानंतर देखील त्याचे वर्षासोबत वागणे सुधरले नाही. अखेर त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून वर्षाने गत 10 जानेवारी रोजी तळवली येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर वर्षाच्या आई वडिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात किरण पवार याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.