ठाणे : मागील सात ते आठ महिन्यांपासून कोरोना या आजारामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच स्तराला बसला आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेला देखील या टाळेबंदीचा फटका बसला असून महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. तर, दुसरीकडे कोरोना काळातील मालमत्ता कर माफ करावा अशी मागणीही लावून धरण्यात आली होती.
असे असतांनाही आता महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकरापोटी 452.37 कोटी जमा झाले आहेत. यामध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समिती सर्वात पुढे असून येथील करदात्यांनी आतार्पयत 180.99 कोटींचा भरणा केला असून सर्वात कमी 13.20 कोटींचा कर भरणा मुंब्रा प्रभाग समितीमधून झाला आहे.
ठाणे महापालिकेमार्फत थकबाकीदारांसाठी थकबाकीवर 100 टक्के सवलत योजना पुढे आणली होती. त्यामुळे देखील महापालिकेच्या तिजोरीत जास्तीचा कर भरणा झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुळे महापालिकेचा आर्थिक गाडाही रुळावरुन खाली होता. कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आणि महापालिकेची आर्थिक सुबत्तेवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. मालमत्ता कर तसेच इतर करांचीही वसुली थांबली होती. त्यामुळे महापालिकेच्या विकास कामांवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले होते.
पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने ठेकेदारांची बिलेही थांबली होती. त्यानंतर पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरवात झाल्यानंतर ठेकेदारांना देखीलबिले अदा करण्यास सुरवात झाली. त्यानंतर पाणीपटटी बिलांची वसुली देखील मागील महिन्यात चांगलीच झाल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन, ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तसेच 15 सप्टेंबर र्पयत कर जमा केल्यास मालमत्ता कराच्या सामान्य करात 10 टक्के सवलत देण्यात आली होती. ही सवलत 30 सप्टेंबर र्पयत वाढविण्यात आली होती.
महत्त्वाची बातमी : पाच लाखांहून अधिक रक्कम असलेल्या ठेवीदारांचे काय? अर्थसंकल्पातील तरतुदीवर बॅंकिंग तज्ज्ञांचा सवाल
दुसरीकडे थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी थकबाकीवर 100 टक्के सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ही सवलत आता फेब्रुवारी अखेर र्पयत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे देखील पालिकेच्या तिजोरीत अधिकचा भरणा झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेने कर वसलुसाठी उचललेल्या पावलांमुळे आणि ठाणेकरांना देखील पालिकेला यासाठी साद दिल्याने महापालिकेच्या तिजोरीत कराचा भरणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार पालिकेच्या तिजोरीत आजच्या घडीला 452.37 कोटी जमा झाले आहेत
mumbai news updates thane municipal corporation gathered wealth from property tax amid corona
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.