मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात होणार आहे. मात्र त्याआधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर नवीन पेच निर्माण झालाय. नाना पटोले यांनी आपल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचे अध्यक्षचे कोण होणार हे अद्याप निश्चित नाही.
अशात अशात महाविकास आघाडीतील अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह देखील आले आहेत. अशात विरोधीपक्षाकडून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची तयारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे.
दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. दरम्यान आज सल्लागार समितीची बैठक देखील पार पडणार आहे.
महत्त्वाची बातमी : मुंबईत नव्या रुग्णांचा भडका; कोरोना रुग्णांचा आकडा हजाराच्या पार
येत्या सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या सर्वांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. महाविकास आघाडीतील काही मंत्री आधीच कोरोनाबाधित आहेत. अशात अधिवेशनाआधी केलेल्या कोविड चाचण्यांमध्ये कुणी मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आलेत तर अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष कसे निवडायचे असा गंभीर प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पडलाय. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी मतदान झालं तर महाविकास आघाडीला संख्याबळ कमी पडू शकतं. त्यामुळे सरकारसमोर अध्यक्षपदाचा तिढा सोडवायचा कसा हा महत्त्वाचा प्रश्न पडलाय.
दरम्यान, आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. या बैठकीत अधिवेशन पुढे न्यायचं का हे ठरवलं जाऊ शकतं. दरम्यान यावर विरोधीपक्ष आज काय भूमिका घेतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाची बातमी : राज्यात आरटीओ विभागाची ई-चलान प्रणाली ठप्प! तत्कालीन परिवहन आयुक्तांच्या आदेशाला हरताळ
mumbai news vidhansabha speaker election corona and budget session of maharashtra
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.