Mumbai North-Central Lok Sabha 2024 Esakal
मुंबई

Mumbai North-Central Lok Sabha 2024: मायानगरीमध्ये हायप्रोफाईल लढत; पण सिद्दीकींची नाराजी काँग्रेसला भारी पडणार?

Mumbai North-Central Lok Sabha 2024: मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आधी कॉँग्रेस तर नंतर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. विलेपार्ले, चांदिवली, कर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, व वांद्रे पश्चिम अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai North-Central Lok Sabha 2024: मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आधी कॉँग्रेस तर नंतर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. विलेपार्ले, चांदिवली, कर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, व वांद्रे पश्चिम अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो. अलिकडे कॉँग्रेसचे एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त व शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी प्रतिनिधित्व केले आहे. भाजपच्या पूनम महाजन या गेल्या दोन टर्मपासून खासदार आहेत. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत तरी त्यांना स्थान मिळू शकले नाही. भाजप यंदा पूनम महाजन यांची उमेदवारी कापणार असल्याची चर्चा आहे. तर आघाडीकडूनही अद्याप उमेदवार जाहिर झाला नाही.

२०१९ चे चित्र

पूनम महाजन (भाजप) विजयी मते : ४,८६,६७२

प्रिया दत्त (कॉँग्रेस) मते : ३,५६,६६७

अब्दुर अंजारिया (वंचित बहुजन आघाडी) मते : ३३,७०३

इम्रानखान (बीएसपी) मते : ४,१९५

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १,३०,००५

वर्चस्व

२००४ : काँग्रेस

२००९ : काँग्रेस

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

पूनम महाजन दोनदा विजयी झाल्या असल्याने भाजपचे पारडे जड

भाजप व कॉँग्रेस अशी पारंपरिक लढाई इथे राहत असल्याने कॉँग्रेसच्या उमेदवाराविषयी उत्सुकता

मतदारसंघातील कॉँग्रेसचे एकमेव आमदार झिशान सिद्दीकी यांचीही पक्षावर नाराजी आहे.

शिवसेनेचे दोन व भाजपचे दोन आमदार असल्याने राजकीयदृष्ट्या महायुती प्रबळ

समाजातील विविध स्तरातील लोक, मतदार राहतात. त्यांचे विविध प्रश्न आहेत.

हे मुद्दे प्रभावी ठरणार

बीकेसीसारखे आर्थिक केंद्र मतदारसंघात

झोपडपट्टीतील नागरिकही मोठ्या संख्येने आहेत. त्याच्या नागरी सुविधांचे प्रश्न

मेट्रो रेल्वे व नवीन रस्त्यांची व नव्या पुलांची कामे या सुरू असल्याने अडचणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT