मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वैतरणा ते सफाळे स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलांचे ५ गर्डर टाकण्यासाठी आज (ता.२३) ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल आणि मेमू गाड्या रद्द करण्यात येणार आहे. तर काही मेल- एक्सप्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड असणार आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वैतरणा-साफळे स्थानकांदरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी पाच गर्डर्स टाकण्यात येणार आहे. रविवार, २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८. ५५ ते सकाळी १०.५५ या वेळेत ट्रॅफिक कम पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान ट्रेन क्रमांक ०१३३७ बोईसर-वसई रोड मेमू आणि दुपारी १२ वाजताची विरार -चर्चगेट लोकल रद्द असणार आहे.
ट्रेन क्रमांक ०१३३८ डोबिंवली-बोईसर मेमू वसई रोड ते बोईसर, ट्रेन क्रमांक ९३००८ डहाणू रोड-बोरिवली लोकल केवळे रोड ते बोरिवली दरम्यान रद्द केली आहे. ट्रेन क्रमांक ९३००९ चर्चगेट -डहाणू रोड लोकल केळवे रोड ते डहाणू रोड दरम्यान धावणार आहे. ट्रेन क्रमांक ९३०१० डहाणू रोड-विरार लोकल केळवे रोड ते विरार दरम्यान रद्द केली आहे. ९३०११ चर्चगेट -डहाणू रोड लोकल केळवे रोड ते डहाणू रोड दरम्यान धावणार आहे.
या गाड्या शॉर्ट टर्मिनेट
ट्रेन क्रमांक १९००२ सुरत-विरार एक्सप्रेस पालघर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक ०९१४३ विरार-वलसाड गाडी विरार ते पालघर दरम्यान रद्द केली आहे. याशिवाय ट्रेन क्रमांक २२९६६ भगत की कोठी-वांद्रे टर्मिनस, १२४७९ जोधपूर-वांद्रे टर्मिनस सूर्या नगरी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक २२९५६ भुज - वांद्रे टर्मिनस कच्छ एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १२९३४ अहमदाबाद - मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १२४८९ बिकानेर - दादर एक्सप्रेस, ट्रेन १९५७८ जामनगर - तिरुनेलवेली एक्सप्रेस उशिरा धावणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.