Dhamendra Pradhan sakal
मुंबई

Mumbai : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या भेटीसाठी जे जे मध्ये चित्रकला प्रदर्शन

डी-नोव्हाच्या सादरीकरणासाठी संचालकांची तारांबळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान गुरूवारी, १९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील जे. जे. कला संचालनालयात येत आहेत. यानिमित्ताने येथील तीनही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावून प्रधान यांना आकर्षित केले जाणार आहे. यासाठी कधी नव्हे इतका परिसर स्वच्छ करण्यात आला असून यासाठी सगळे अधिकारी, कर्मचारी झपाटून कामाला लागले आहेत.

प्रधान यांच्या हस्ते येथील जे. जे. कला, जे.जे. उपयोजित कला आणि सर जे.जे. वास्तुशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. मात्र मूळ कार्यक्रम हा डी-नोव्हाच्या इतर घोषणेच्या संदर्भात असल्याने त्याच्या सादरीकरणासाठी येथील संचालक आणि अधिकाऱ्यांची तारांबळ सुरू आहे. तर हा कार्यक्रम अधिकाअधिक यशस्वी करण्यासाठी मंत्रालयातील काही अधिकारी आणि उद्योगपतीही लक्ष देऊन असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा हा मुंबई दौरा जेजे कला संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या जे. जे. कला, जे. जे. उपयोजित कला आणि सर जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय या महाविद्यालयांना डी-नोव्हाचा दर्जा देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली असली तरी त्याची यंदाच्या शैक्षणिक वर्षांत अंमलबजावणी होऊ शकली नाही.

या डी-नोव्हाचा दर्जाच्या आडून अनेक उद्योगपती आणि खाजगी क्षेत्रात कलेच्या नावाने उद्योग करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पुनवर्सन केले जाणार असल्याने या विद्यापीठाला केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना बोलावून त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक आणि इतर तरतुदींची घोषणा या निमित्ताने केली जाणार आहे. त्यासाठी प्रधान यांना खूष करण्यासाठी येथे तीनही महाविद्यालयातील काही मोजक्याच विद्यार्थ्यांच्या चित्राचे प्रदर्शन लावले जाणार असून त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा प्रधान यांच्या हस्ते करून घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

केंद्रीय मंत्री प्रधान यांनी डी-नोव्हाचा दर्जा आणि त्यासंदर्भात मोठी घोषणा करावी यासाठी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि डी-नोव्हाचा दर्जा मिळविण्यासाठी पडद्याआड असलेले अनेक चित्रकार, कलावंत कामाला लागले आहेत. तर या सर्व प्रकारावर राज्यातील कलेच्या क्षेत्रात शैक्षणिक योगदार देणाऱ्या तज्ज्ञांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. डी-नोव्हासंदर्भात सर्व काही रेटून नेले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचा विजय अन् पाकिस्तानला धक्का; Jasprit Bumrah ने मोडला कपिल देव यांचा विक्रम, ७ मोठे पराक्रम

Eknath Shinde: शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंची मागाठाणेत हॅट्‌ट्रिक, जाणून घ्या विजयाची इनसाइड स्टोरी

Sangli Election Results : पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात? खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यापैकी एकाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT