मुंबई

बनावट मास्क बनावणाऱ्या युपीतील भामट्यांना मुंबई पोलिसांचा दणका

अनिश पाटील



मुंबई - नामांकीत कंपन्यांचे बनावट एन 95 मास्क बनावणा-या उत्तर प्रदेशातील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी एका आरोपीसह पाच हजार बनावट एन-95 मास्क व मास्क बनवण्याचे साहित्य गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहे.

कोरोनामुळे मास्कची प्रचंड मागणी वाढल्यामुळे बनावट मास्कही बाजारात येण्यास सुरूवात झाली होती. त्यावेळी 28 जूनला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विनस या नामांकीत कंपनीचे बनावट एन-95 मास्क घेऊन आलेल्या टेम्पोवर कारवाई करून 17 हजार 300 बनावट मास्क जप्त केले होते. याप्रकरणी एका आरोपीला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपासात उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील एका फॅक्टरीतून या बनावट मास्कला पुरवठा केला जात असल्याची माहिती निष्पन्न झाली. गुन्हे शाखेच्या कक्ष-3 चे प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने गुरुवारी गाझियाबाद येथील फॅक्टरीवर छापा टाकला. त्या कारवाईत विविध प्रकारचे पाच हजार बनावट मास्क जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी मोहम्मद सोहेल मोहम्मद इद्रीस अन्सारी(31) याला अटक केली असून न्यायालयालयाने त्याला याप्रकरणी 2 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फॅक्टरीमधून दोन स्कीन प्रिंटसह 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Mumbai police arrest from Uttar Pradesh for making fake masks

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT