मुंबई

कांदिवली बनावट लसीकरण घोटाळ्याप्रकरणी पाच जण अटकेत

बोगस लसीकरणाचा मास्टरमाईंड दहावी नापास असल्याची माहिती

विराज भागवत

बोगस लसीकरणाचा मास्टरमाईंड दहावी नापास असल्याची माहिती

मुंबई: कांदिवली परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांनी दावा केला होता की त्यांच्या सोसायटीमध्ये 'लसीकरण' घोटाळा झाला. घडलेल्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापलं होतं. अशातच मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून, फसवणूकीच्या कलमांखाली पाच जणांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यातील मास्टरमाईंड हा दहावी नापास आहे. या प्रकरणी मध्यप्रदेशच्या सतना येथे करीम नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशीही केली आहे. हा घोटाळा उघडीसह आल्यानंतर करीमने मुंबईहून पोबारा गेला. या बनावट लसींचा पुरवठा तोच करत असल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. लोकांना देण्यात आलेल्या लशींच्या वैधतेबाबतही पोलिस तपास करत आहेत. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अहवालाची वाट बघितली जात आहे. (Mumbai Police arrested 5 people in connection of Kandivali housing society vaccination scam)

सोसायटीतील रहिवाशांना देण्यात आलेली लस ही परवानगी असलेल्या रुग्णालयातून देण्यात आली नव्हती. लसीच्या कुपीही सीलबंद नव्हत्या. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर चार लोकांना अटक केली. यात एक डॉक्टर आणि एक आरोपी जो लसीची ने-आण करायचा, त्याला मध्यप्रदेश येथून पोलिसांनी अटक केली. बोगस लसीकरण शिबिर महेंद्र सिंह नामक व्यक्ती चालवत असून तोच मास्टरमाइंड आहे. अशा प्रकारचे उपक्रम हा आरोपी खूप महिन्यांपासून आयोजित करत आहे. महेंद्र सिंह हा दहावी नापास आहे. या रॅकेटने आतापर्यंत ९ ठिकाणी अशा प्रकारचे लसीकरण शिबिर आयोजित केले आहेत. कांदिवली पोलीस ठाण्यात सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींनी बँकेत ठेवलेली ९ लाखांची रक्कम गोठविण्याची कारवाईही केल्याचीही माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

प्राथमिक चौकशीनुसार, या लसींची खरेदी अधिकृत लोकांकडून करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या लसी बनावट होत्या की खऱ्या आणि प्रभावी होत्या याबद्दल सध्या तपास केला जात आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांनी कांदिवलीच्या हाउसिंग सोसायटीतील बनावट लसीकरणाबद्दल बोलताना दिली. आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात बनावट लसीकरण रॅकेट चालवणारा एक जण, हाऊसिंग सोसायटीसाठी कॅम्प आयोजित करणारा एक जण आणि बनावट ओळखपत्र बनवणारे आणि चोरणार दोघे जण यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातून या लसी आणणाऱ्या पाचव्या व्यक्तिची चौकशी सुरू आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

लसीकरण रॅकेटविरूद्ध आणखी तक्रार दाखल

मॅचबॉक्स पिक्चर्सने त्यांच्या कर्मचार्‍यांना लस दिल्याच्या कथित आरोपांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. याबाबत प्राथमिक तक्रार कांदिवली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या दोन्ही तक्रारींचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT