Mumbai Crime - व्यावसायिकाकडे 90 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया अग्निशमन अधिकाऱ्याला गुरूवारी माहीम पोलिसांनी अटक केली आहे.विद्देश गायकवाड या 24 वर्षीय आरोपीला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून अग्निशमन दलाचा गणवेश हस्तगत केला आहे. अग्निप्रतिबंध उपाययोजनांविषयीचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण पुढे करून आरोपी पैशाची मागणी करत होता.
आरोपीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे. तसेच आरोपीने बेकरी व अग्निशमनविषयक प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या इतर आस्थापनांबाबतची माहीती कुठून मिळविली,यासाठी त्याचे साथीदार कोण आहेत का याचा पोलीस तपास करीत आहेत.
माहीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गांवरील गुलजार बेकरीच्या मालकाकडे 30 एप्रिल रोजी एक व्यक्ती आली होती. या व्यक्तीने आपण अग्निशमन अधिकारी असल्याचे सांगून बेकरीचे अग्निप्रतिबंध उपाययोजनांशीसंबंधित प्रमाणपत्र आणि अग्निसुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे व्यावसायिकाला सांगितले.
बेकरीच्या मालकाकडे त्याने 90 हजार रुपयांची मागणी केली. तसेच त्यासाठी 30 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, असेही त्याने सांगितले. बेकरी मालकाने याबाबत माहीम पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी फसवणूक व तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. नंतर आरोपीची ओळख पटवत माहीम पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.