Saurabh Tripathi_DCP 
मुंबई

Saurabh Tripathi: निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींचं निलंबन मागे; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जबरदस्तीनं खंडणी वसूल केल्याप्रकरणी गेल्या वर्षी ठाकरे सरकारनं निलंबित केलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आलं आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीनं हा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. (Mumbai Police DCP Saurabh Tripathi suspension revoked Big decision of Chief Secretary committee)

अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांच्या निलंबनासाठी राज्याच्या गृहविभागानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सही करत २२ मार्च २०२२ रोजी त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

कारवाई मागे घेताना समितीनं काय म्हटलं?

यासंदर्भात मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची स्थापन करण्यात आली होती. या समितीनं त्रिपाठी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली. आयपीएस अधिकाऱ्याला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी निलंबित ठेवता येत नाही, त्यामुळं त्रिपाठींचं निलंबन मागे घेण्यात येत आहे, असं या समितीनं निर्णय घेताना म्हटलं आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर बेपत्ता

त्रिपाठी यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. १६ मार्च २०२२ रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना फरार घोषित केलं होतं. त्रिपाठी यांच्याविरोधात पुरावे पोलिसांना सापडले होते. दरम्यान, डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी तक्रारदाराला फोन करुन तक्रार मागे घेण्यासही सांगितलं होतं. यासंबंधिच्या ऑडिओ क्लीपही मुंबई पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. (Latest Marathi News)

दरम्यान, अटकेपासून वाचण्यासाठी सौरभ त्रिपाठी यांनी स्थानिक कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. या याचिकेत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. एफआयआरमध्ये आपलं नाव नसून पोलीस स्टेशनकडून अंगाडियाकडून वसूली केली जात असल्याची माहिती आपल्याला नव्हती. (Marathi Tajya Batmya)

तीन पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांना अटक

या प्रकरणात गुन्हे शाखेकडून ४ आरोपींना अटक करण्यात आली होती. यांपैकी ३ जण पोलीस अधिकारी होते. अटक झालेले पोलीस निरिक्षक ओम बंगाटे यांच्या चौकशीतून डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT