E-challan sakal
मुंबई

Mumbai : कारवाईसाठी मोबाईल वापरास पोलिसांना मज्जाव

पोलिस कर्मचाऱ्यांनी ई-चलान यंत्रांऐवजी मोबाईलचा वापर केल्यास कारवाईचा आदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पोलिस कर्मचाऱ्यांनी ई-चलान यंत्रांऐवजी मोबाईलचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाईचा आदेश अपर पोलिस महासंचालकांनी दिला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सध्या ऑनलाइन पद्धतीनेच दंडात्मक कारवाई केली जाते. त्यासाठी राज्यभरात सहा हजार ई-चलान यंत्र वितरित करण्यात आले आहे. मात्र या यंत्रांचा वापरच होत नाही. कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांनी ई-चलान यंत्रांऐवजी स्वतःच्या खासगी मोबाईलचा वापर करून दंडात्मक कारवाई केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दंडासाठी स्वतःचे मोबाईल वापल्यामुळे कारवाईचे स्थळ, वेळ आणि तारखेच्या अडचणी येत आहेत. त्याबद्दल वाहतुकदारांकडून तक्रारी येत असल्याने यापुढे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी ई-चलान यंत्रांऐवजी मोबाईलचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाईचा आदेश अपर पोलिस महासंचालकांनी दिला आहे.

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून स्वतःच्या खासगी मोबाईलवर वाहतुकदारांची छायाचित्र काढून ई-चलान यंत्रावर अपलोड करण्याचे प्रकार वाढले आहे. ज्यामध्ये वाहनाचा प्रकार, ठिकाण दिसत नसून त्यामध्ये फक्त वाहनाचा क्रमांक दाखवला जातो. यामुळे ई चलान यंत्रांचा प्रभावी वापर करून कारवाई करण्याचा आदेश नव्याने दिला आहे.

यंत्रांच्या दुरुस्तीची सूचना

पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्याकडील ई-चलान यंत्रांबाबत काही समस्या अडचणी असल्यास संबंधित जिल्हा स्तरावरील प्रतिनिधीकडे संपर्क साधून यंत्रांची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. या दरम्यान ई-चलानऐवजी खासगी मोबाईलचा वापर करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अपर पोलिस महासंचालक विभागाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT