मुंबई : जेएसडब्ल्यू ग्रुपचे (JSW Steel) व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्याविरोधातील बलात्काराचा गुन्हा मुंबई पोलिसांनी रद्द केला आहे. यासंदर्भातील केस संवण्यात येत असल्याचा क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी रविवारी कोर्टात सादर केला. हा गुन्हा मागे घेण्यामागचं कारणंही पोलिसांनी सांगितलं आहे. (Mumbai Police filed a closure report in the alleged rape case against Chairman and MD of JSW Group Sajjan Jindal)
पोलिसांनी सांगितलं कारण
क्लोजर रिपोर्ट हा साक्षीपुराव्याच्या पडताळणीनंतर सादर करण्यात आला आहे. पीडित महिलेनं ज्या हॉटेलमध्ये आपल्यावर सज्जन जिंदाल यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला आहे त्या हॉटेलच्या स्टाफची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत हे निष्पण्ण झालं की, हॉटेलच्या स्टाफनं हे स्पष्ट सांगितलं आहे की, घटना घडली त्यादिवशी जिंदाल हे त्या हॉटेलमध्ये गेले नव्हते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. (Latest Maharashtra News)
जिंदाल यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल
तक्रारदारानं बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये डिसेंबर २०२३ मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत पीडित महिलेनं म्हटलं होतं की, जानेवारी २०२२ मध्ये कंपनीच्या हेडऑफिसच्या वर असलेल्या पेंटहाऊसमध्ये आपला विनयभंग झाला होता. बीकेसी पोलिसांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नसल्यानं या महिलेनं थेट कोर्टात धाव घेतली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी सज्जन जिंदाल यांना बलात्कारप्रकरणी भांदवि कलम ३७६, ३५४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. (Marathi Tajya Batmya)
आरोप फेटाळले
दरम्यान, जिंदाल यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. आपल्यावर लावलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचं सांगताना चौकशीला आपलं पूर्ण सहकार्य असेल असंही त्यांनी म्हटलं होतं. तपास चालू असल्यानं आम्ही या टप्प्यावर अधिक भाष्य करणे टाळू, पण तुम्हाला विनंती करतो की कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा,” असं त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. (Latest Marathi News)
पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं की, महिलेनं कथित घटनेनंतर बराच काळानंतर गुन्हा दाखल केला होता. तसेच आपल्या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही पुरावा सादर करण्यात ती अयशस्वी ठरली. तक्रारदार महिला आपलं म्हणणं नोंदवण्यासाठी पोलिसांसमोर हजर झाली नाही आणि न्यायालयाचा मौल्यवान वेळ तिनं वाया घालवला.
त्याचबरोबर गुन्ह्याच्या कथित घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे, त्यांनी असा निष्कर्ष काढला की 'महिलेसोबत कोणतेही गैरवर्तन झालेलं नाही' आणि मॅजिस्ट्रेट कोर्टाला या प्रकरणात निकाल देण्याची विनंती केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.