Mumbai Sakal
मुंबई

Mumbai On Alert : मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता! सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर पोलिस हाय अलर्टवर

रोहित कणसे

आगामी विधानसभा निवडणुका आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांना संभावित दहशतवादी हल्ल्यासंबंधी इनपुट्स दिले आहेत. ज्यानंतर मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहराच्या कानाकोपऱ्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या अलर्टनंतर मुंबईतील अनेक धार्मिक स्थळ तसेच गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच पोलिसांना गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर मॉक ड्रिल घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व डीसीपींना आपल्या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यास देखील सांगण्यात आले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्यांने सांगितले की, शुक्रवारी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केटभागात मॉक ड्रिल घेतली होती. या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. येथे दोन प्रमुख धार्मिक स्थळ देखील आहेत. पोलिसांनी सेक्युरिटी ड्रिल संदर्भात माहिती देताना सांगितले की सुरक्षेच्या अनुषंगाने ही एक्सरसाइज घेण्यात आली होती.

पण अचानक या ड्रिल्स का घेतल्या जात आहेत याबद्दल कुठलीही माहिती देण्यात आली नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की सण आणि निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबईतील इतर ठिकाणी मॉक ड्रिल घेतल्या जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीची केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु

Krushi Purskar 2024: चार वर्षे रखडलेले कृषी पुरस्कार विजेते शेतकरी मुंबई दाखल; पण सुविधांपासून वंचित; शासनाचा अजब कारभार

IDFC FIRST Bank: IDFC विलीनीकरण झाले पूर्ण; गुंतवणूकदारांना होणार मोठा फायदा, किती शेअर्स मिळणार?

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या घरात बिचुकलेंचा धुमाकूळ, अंकिताला सुनावले खडेबोल

Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्रीत नऊ दिवस काय करावे अन् काय करू नये? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT