मुंबई

मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट पार्ट 2, तब्बल 1 हजार 448 गुन्हेगारांची तपासणी

अनिश पाटील

मुंबईः गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा ऑपरेशन ऑल आऊट राबवले असून त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत 1 हजार 448 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच 33 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत 53 प्रकरणं दाखल करण्यात आली आहे.

गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात सक्रिय मोहिम राबविण्यासाठी मुंबई
पोलिसांनी 23 डिसेंबरच्या मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन केले. सह पोलिस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था ) विश्वास नांगरे पाटील आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलिस ठाण्यात ही कारवाई पार पाडली. सर्व 5 प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त, सर्व 13 परिमंडळ विभागांचे पोलिस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले. प्रत्येक पोलिस ठाण्यांमधून जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. 

प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक टीमसह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती आणि क्रियांसाठी हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखानांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, ड्रग्स, इ. म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू, शोधण्यासाठी नाकाबंदीचे आणि कोम्बिंग ऑपेरशनचे आयोजन, फरार आणि पाहिजे व्यक्तींना अटक करणे, प्रलंबित अजामीनपात्र वारंट आणि स्थायी वारंटची बजावणी,अवैध दारू, जुगार इत्यादी अशा बेकायदेशीर क्रियांवर कारवाई, पोलिस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या ऑपरेशन अंतर्गत हाती घेण्यात आली होती.

गंभीर गुन्ह्यातील अभिलेखावरील 1 हजार 448 गुन्हेगार तपासले त्यापैकी 238 आरोपी मिळून आले आणि 93 आरोपींवर कारवाई करण्यात आली.

  • 9 एन.डी.पी.एस कायदयाअंतर्गत गांजा सेवन संदर्भात एकूण कारवाई
  • 715 हॉटेल्स, लॉज, मुसाफिरखाना तपासले.
  • 112 ठिकाणी नाकाबंदी दरम्यान 7426 वाहनांची तपासणी केली.
  • 213 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.
  • 14 अवैध शस्त्रे ( धारदार हत्यारे, 01 गावठी कट्टा, 01 देशी रिव्हॉल्वर )जप्त केले.
  • 27 अजामीनपात्र वारंट ची बजावणी केली.
  • 439 महत्वाच्या ठिकाणी पायी गस्त आयोजित करण्यात आली.
  • 33 फरार आणि पाहिजे आरोपींना अटक करण्यात आली.
  • 10 हद्दपार झालेले आरोपी पुन्हा हद्दीत मिळुन आल्याने त्यांच्याविरूध्द मुंबई पोलिस
  • कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai police operation all out part 2 against criminals activity raids

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाचा मोठा निर्णय! नोएल टाटांनी खरेदी केली नवी कंपनी; किती कोटींना झाला करार?

AUS vs PAK 2nd ODI : १९ वर्षानंतर पाकिस्तान जिंकला! विराटकडून धुलाई झालेला गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला

Amit Shah : समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला : अमित शहा

German Bakery Bombing Case : जर्मन बेकरी बाँबस्फोटातील हिमायत बेग पुन्हा कारागृहात

'स्वतःच्या स्वार्थासाठी कारखाना बंद पाडण्याचं पाप मुश्रीफांनी केलंय'; जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरींचा घणाघात

SCROLL FOR NEXT