Mumbai Police Suicide Help eSakal
मुंबई

Mumbai Police : गुगलवर शोधत होता कशी करायची आत्महत्या; इंटरपोलचा अलर्ट आला अन् मुंबई पोलिसांनी वाचवले तरुणाचे प्राण

Sudesh

इंटरपोल आणि मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईतील एका तरुणाचे प्राण वाचले आहेत. 28 वर्षांचा हा तरुण गुगलवर 'आत्महत्या करण्याची सर्वात चांगली पद्धत' शोधत होता. याबाबत इंटरपोलला माहिती मिलताच, त्यांनी मुंबई पोलिसांना अलर्ट केले. पोलिसांनी वेळीच या तरुणाच्या घरी पोहोचत त्याचे प्राण वाचवले.

गुगल आपल्या यूजर्सच्या सुरक्षिततेबाबत भरपूर खबरदारी घेतं. गुगलवर आपण आत्महत्या असं देखील सर्च केलं, तरी सर्वात आधी सुसाईड हेल्पलाईन नंबर तुम्हाला समोर दिसतो. त्यामुळेच अशा गोष्टी सर्च केल्यानंतर गुगलचे सर्व्हर्स लगेच पोलिसांना अलर्ट करतात. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

इंटरपोल ही जागतिक स्तरावर काम करणारी पोलिसांची एक संघटना आहे. बुधवारी मुंबईतील तरुणाने आत्महत्येची पद्धत गुगलवर सर्च केल्यानंतर, कंपनीने इंटरपोलला अलर्ट पाठवला. गुगलचा अलर्ट मिळाल्यानंतर इंटरपोलने थेट मुंबई पोलिसांना संपर्क करत याबाबत माहिती दिली. मुंबई पोलिसांच्या युनिट-11 ने या युवकाचा मोबाईल ट्रेस करून त्याची लोकेशन मिळवली आणि त्याचा जीव वाचवला.

कशामुळे करत होता आत्महत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मूळचा राजस्थानचा आहे. तो मुंबईमध्ये मालाड पश्चिममध्ये असणाऱ्या मालवणी येथे राहत होता. दोन वर्षांपूर्वी या तरुणाच्या आईला काही कारणाने अटक झाली होती. तेव्हापासून तो आपल्या आईला सोडवण्याचा प्रयत्न करत होता.

हा तरुण गेल्या सहा महिन्यांपासून बेरोजगार होता. तसंच, आपल्या आईची सुटका होत नसल्यामुळे तो आणखी दुःखी होता. यामुळेच त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला. त्याने बऱ्याच वेळा गुगलवर 'Suicide best way' अशा आशयाच्या गोष्टी सर्च केल्या होत्या. यामुळेच इंटरपोलच्या अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष गेलं.

पोलिसांनी केलं समुपदेशन

पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन, त्याचं समुपदेशन केलं. त्यानंतर त्याला काळजीपूर्वक समज देत, आपल्या नातेवाईकांकडे जाण्यास सांगण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT