मुंबई

शहाळ्याच्या ट्रकची झडती घेताच पोलिसच झाले अवाक; समोर होतं एक टन 800 किलो गांजाचं घबाड

अनिश पाटील

मुंबई, ता.13 : अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (एएनसी) घाटकोपर युनिटने धडाकेबाज कारवाई करून विक्रोळी पूर्व येथून एका ट्राकमधून एक हजार 800 किलो गांजा जप्त केला. काळ्या बाजारात या ड्रग्सची किंमत  3 कोटी 60 लाख रुपये आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून भिवंडी येथील म्होरक्याचा शोध सुरु आहे.

ANC च्या घटकोपर युनिटला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिस पथकाने MMRDA पादचारी पुलाच्या खाली, विक्रोळी पोलिस ठाणे येथील बस स्टॉप, पूर्वद्रूतगती महामार्ग, विक्रोळी पूर्व या ठिकाणी कौशल्यपूर्णरीत्या सापळा लावून गांजाने भरलेला टाटा ट्रक ताब्यात घेतला. हा ट्रक शहाळ्यांनी भरलेला दिसत होता. मात्र त्यात बेमालूमपणे गांजा लपवून ठेवण्यात आला होता.

पोलिसांनी ट्रकची झडती घेत एकूण 3 कोटी 60 लाख रुपये किमतीचा 1800 किलो गांजा ट्रकसह जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी आकाश सुभाष यादव या 25 वर्षीय तरुणाला आणि दिनेशकुमार सरोज या 26 वर्षीय तरुणाला एनडीपीएसअंतर्गत अटक केली. पुढील तपासात जप्त केलेला गांजा हा ओरिसा येथून आंध्र प्रदेश, सोलापूर, पुणेमार्गे मुंबईत आणला जात  होता असं निदर्शनास आलं.

त्यानंतर तो  भिवंडी येथील गोडावूनमध्ये ठेवला जात होता. त्यानंतर हा गांजा नवी मुंबई आणि उपनगरे, ठाणे, पालघर, वसई विरार, मिरा रोड  तसेच सुरत या ठिकाणी वितरीत केला जात असे. या टोळीचा प्रमुख लक्ष्मीकांत प्रधान हा असून तो ओरिसा राज्यातील भरामपूर, जिल्हा जंगम येथे राहणारा आहे. ही टोळी एका महिन्यात पाच टन गांजा मुंबईसह इतर ठिकाणी विक्री करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या टोळीचा व्यवहार रोखीने, हवालामार्फत तसेच बँकेद्वारेदेखील केला जात होता अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबेयांनी दिली.  

हे नेटवर्क उद्धवस्त करण्यासाठी एएनसीचे डीसीपी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटनेअथक परिश्रम घेतले.या टोळीची मोडस ऑपरेंडी नाविण्यपूर्ण आहे.  या टोळीचे भिंवडीमध्ये गोडावून आहे. ही टोळी प्रत्येक महिन्याला दोन खेपा गांजासाठी ओरिसा राज्यात मारायची. मात्र प्रत्येक वेळेला ते वेगळे वाहन भाड्याने घ्यायचे. शाहळे आणण्यासाठी म्हणून भाड्याने घेतलेला ट्रक ते भिंवडीत देखील गोडावून पासून खूप लांब ठेवायचे.

आंध्र आणि ओरिसा राज्याच्या सीमेवर असलेल्या त्रिसुर जिल्ह्यापर्यंत थेट ट्रक घेऊन न जाता यातील चालक व सहकाऱ्याला एका हॉटेलमध्ये ठेवले जायचे. त्यांचा मोबाईल देखील जप्त केला जायचा. त्यानंतर टोळीतील ओरिसातील ड्राईव्हर पुढे ट्रक घेऊन ओरिसा राज्यातील गंजम जिल्ह्यात जायचा. तेथे गांजा भरून ते चार दिवसांनंतर त्रिसुर जिल्ह्यात यायचे.  तेथे शहाळे विकत घेऊन ते ट्रकमध्ये भरले जायचे. जेणेकरून गांजा वाहतुकीवर कोणाला संशय येणार नाही. गांजा व शहाळ्यांनी भरलेला ट्रक हैदराबाद, सोलापूर, पुणे मार्गे मुंबईत आणला जायचा. 

mumbai police seized illegal herbs worth 3 crore 60 lacs from vikroli mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतसाठी खजिना उघडणारा लखनऊ सुपर जायंटचा मालक कोण? किती आहे संपत्ती?

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा देतोय कॅन्सरशी झुंज ; मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्याही डोळ्यात आलं पाणी

Kolhapur: पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT