pollution   sakal
मुंबई

Mumbai Pollution: हवा प्रदूषित करणाऱ्या बिल्डरांवर महापालिकेकडून कारवाई

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai: नवी मुंबईत चालू असलेल्या बांधकामांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे धुराचे प्रमाण, रासायनिक कंपन्यांकडून होणारे वायुप्रदूषण यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात घसरण होत आहे. सध्याचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५० ते २००; तर कधी २५० पर्यंत एक्यूआयपर्यंत ढासळत आहे.

या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने धूळशमन यंत्राद्वारे हवेतील धुळीचे प्रमाण अल्प करण्याचा प्रयत्न केला जात असून काही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.

नवी मुंबई शहरात महापे पावणे औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वसले आहे. शहरातील २५ टक्के भाग औद्योगिक क्षेत्राने व्यापला आहे. त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे चालू आहेत. वाढत्या वाहनांमुळेही हवा प्रदूषण होत असल्याचे निकष लावले जात आहेत. परिणाणी गेल्या काही दिवसांपासून महापे, नेरूळ, सानपाडा आदी ठिकाणी रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणावर धुरके निदर्शनास येत आहे.

यामध्ये धूलिकण, रासायनिक कंपन्यांतून होणाऱ्या वायुउत्सर्जनाचा उग्र दर्प येत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. सोबतच पावणे, जुईनगर, घणसोली येथील नाल्यात रसायन मिश्रित पाणी सोडले जात असल्याने अनेकदा येथील रहिवाशांचा कोंडमारा होत आहे.

या वेळी पालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सांगितले, की पालिकेकडून शहरात चालू असलेल्या विविध बांधकामांच्या ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी हवेत धुळीचे प्रमाण वाढू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतरही या व्यावसायिकांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात न आल्याने त्यांच्यावर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये पाच बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे.

तसेच रस्त्यावरील दुभाजकाच्या लगतची धूळ नष्ट करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने साफसफाई केली जात आहे. शहरातील पारंपरिक स्मशानभूमीद्वारे होणारे धुराचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाईप नॅचरल गॅसच्या शवदाहिन्या बसवणे, इलेक्ट्रिक बसेस अधिकाधिक उपलब्ध करून देणे यांसह अन्य उपाययोजना अवलंबण्यात येत असल्याचेही आरदवाड यांनी सांगितले.

कारवाई करण्यात आलेल्यांची नावे : एकूण दंड

रहेजा युनिव्हर्सल प्रा. लि. नेरूळ : १,५९,०००,

मोरेश्वर डेव्हलपर नेरूळ : १,३६,०००

अरिहंत एडविका वाशी : १,११,०००

एल अँड टी रियालिटी वेस्ट नेरूळ : १,२०,०००

नवी मुंबईतील प्रदूषित हवेत धूलिकणांचे प्रमाण आढळून आल्याने त्याविषयी कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून होणाऱ्या वायुप्रदूषणासंदर्भात कंपन्यांना अचानक भेटी देऊन पाहणी केली जाते. यामध्ये दोषींना नोटीसही बजावल्या जातात.

- सतीश पडवळ, अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

..

नेरूळ आणि महापे परिसरात आठवडाभर रात्री आणि दिवसादेखील धूळशमन यंत्रणेने (एअर प्युरिफाय मोबाईल व्हॅन) हवेतील धूळ खाली बसण्याकरिता पाण्याचे फवारे मारले जात आहेत.

- शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT