Mumbai Pollution sakal
मुंबई

Mumbai Pollution News : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मनपा लागली कामाला; आयुक्तांनी दिले कडक निर्देश !

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील वातावरणातील बदलांमुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वायुप्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने आज मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. संबंधित यंत्रणांना ती अनिवार्य असून त्यांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्याबाबत अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी विभागवार पथकेही नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. त्यावर उपाययोजनांसाठी पालिकेने तत्काळ पावले उचलली आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारतींचे काम सुरू असून धुळीचे प्रमाण वाढले आहे. धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

धूळ व प्रदूषण वाढवणाऱ्या संबंधितांनी त्यावर तत्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालिकेने दिले आहेत. त्यासाठी पालिकेने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

विभागस्तरावर पथके तैनात

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी विभागवार पथके नियुक्त करून त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. छोट्या, मध्यम आणि मोठ्या विभागासाठी प्रत्येकी दोन, चार आणि सहा पथके नियुक्त केली जाणार आहेत.

अंमलबजावणी पथकांनी संबंधित परिसराला भेट देऊन कामाच्या ठिकाणाचे व्हिडीओ चित्रण करावे. कामाच्या ठिकाणी तरतुदींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास काम थांबवण्याची नोटीस जारी करणे आणि/किंवा कामाचे ठिकाण सील करणे अशी कठोर कारवाई तत्काळ करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

अशी आहेत मार्गदर्शक तत्त्वे

- साहित्य वाहून नेणारी वाहने पालन करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करावी.

- आठ वर्षांहून अधिक जुन्या अवजड डिझेल वाहनांना मुंबई कार्यक्षेत्रात वाहतूक करण्यास सक्त मनाई असेल.

- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढील महिनाभराच्या कालावधीत दररोज बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, टाटा पॉवर आणि जवळपासच्या औद्योगिक वसाहत क्षेत्रातील उद्योगाच्या ठिकाणांहून उत्सर्जित होणाऱ्या वायुप्रदूषणाचे दैनंदिन स्वरूपात एक महिन्यापर्यंत निरीक्षण करून योग्य ती कारवाई करावी.

- सर्व बांधकाम व्यावसायिक आणि विकसकांनी ट्रॅकिंग सिस्टीम बसवलेली आहे अशाच वाहनांचा कामांसाठी वापर करावा.

- सार्वजनिक रस्ते, पदपथ, पदमार्गिका आणि मोकळ्या जागांवर बांधकाम साहित्य व राडारोडा टाकला जाणार नाही याची खात्री करावी.

- पालिकेच्या कार्यक्षेत्रातील भौगोलिक क्षेत्रामध्ये विशेषतः क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) आणि कचरा जाळण्याच्या संभाव्य ठिकाणी कुठेही उघड्यावर कचरा जाळण्यावर पूर्णपणे बंदी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान नसतं तर निवडणूक आयोगच नसतं' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT