मुंबई

आता मुंबईच्या समुद्रकिनारी बिनधास्त करा, कुणालाही घाबरायचं कारण नाही..

सकाळ वृत्तसेवा

आपलं लग्न खास डेस्टीनेशनवर व्हावं अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. मुंबईतल्या तरूण-तरूणींसाठी असंच एक खास लोकेशन तयार होतंय. जिथं समुद्राला साक्ष ठेवून जोडप्यांना सात फेरे घेता येतील. 

प्रेमीयुगुलांसाठी समुद्रकिनारे म्हणजे हक्काचं ठिकाण.. समुद्रकिनारी फिरत, लाटांचा मनमुराद आनंद घेत मावळत्या सुर्याला साक्ष ठेवून अनेकांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या असतील.

पण आता याच समुद्रकिनारी सनई, चौघडे वाजतांना दिसतील. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील भाऊच्या धक्क्याजवळील डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल ते आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल परिसरातील सुशोभीकरणाला वेग आलाय. डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनलच्या इमारतीची पुनर्रचना करण्यात येत असून, तिथं अत्याधुनिक सोयीसुविधांचं रेस्टॉरंट उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. टर्मिनलसमोरच्या हिरवळीवर सागराच्या साक्षीने विवाह सोहळे आयोजित करण्यास परवानगी दिली जाणारं. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच समुद्रकिनारी विवाह करण्याची संधी मिळणार आहे.

डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रेस्टॉरन्ट आणि दुसऱ्या मजल्यावर विविध समारंभांसाठी हॉल असेल. याशिवाय हिरवळीवर लग्नसमारंभाची सोय असेल. मार्च महिन्यापर्यंत ही सेवा सुरू होईल. हा परिसर डॉकबाहेर असल्यानं विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेण्याची गरज भासणार नाही

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून पूर्व किनारपट्टीचा चेहरामोहरा वेगानं बदलतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या लग्नासाठी डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर निश्चित व्हा. सात फेऱ्यांसाठी समुद्राची गाज साद घातलीय. 

WebTitle : mumbai port trust gave permission for beach wedding in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT