वडाळा : मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai port trust) पेन्शनर्सना (pensioners) दिवाळीपूर्वी थकबाकी (dew payments in diwali) मिळण्याचे आश्वासन मिळाले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सी. मेंडोसा, उपाध्यक्ष जे. आर. पाटील, जनरल सेक्रेटरी डी. एच. डिंगरेजा व संयुक्त सचिव बी. बी. चिपळूणकर यांनी मंगळवारी (ता. १२) मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा (rajiv jalota) यांची भेट घेऊन पेंशनर्सना थकबाकी देण्याची पुन्हा मागणी केली. तेव्हा दिवाळीपूर्वी थकबाकी देण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
भारतातील प्रमुख बंदरातील सेवेतील व सेवानिवृत्त कामगारांना १ जानेवारी २०१७ पासून लागू झालेल्या वेतन करारानुसार थकबाकी मिळाली आहे. मात्र मुंबई बंदर हे प्रीमिअर पोर्ट असतानादेखील या बंदरातील सेवेतील सहा हजार कामगारांना व ३५ हजार पेन्शनर्सना अद्याप वाढीव वेतनाची थकबाकी न मिळाल्यामुळे कामगार व पेन्शनर्समध्ये प्रचंड असंतोष आहे.
कौटुंबिक वेतनात सुटसुटीतपणा
या भेटीदरम्यान मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पेन्शन अदालत आणि कौटुंबिक वेतनात सुटसुटीतपणा यावा, याबाबत चर्चा केली. तेव्हा मुख्य लेखाधिकारी मुळे यांनी त्यास संमती दर्शविली. गोदी कामगारांच्या या हक्काच्या मागणीबाबत गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा चालू आहे, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मारुती विश्वासराव यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.