डोंबिवली - डोंबिवली जिमखान्याची कार्यकारीणी मनमानी कारभार करत खासगीकरणाचा घाट घालत असल्याचा आरोप करत जिमखाना सदस्यांनी कार्यकारिणी विरोधात रविवारी लाक्षणिक उपोषण पुकारले. सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता खेळाचा सराव, व्यायाम शाळा याचे दर वाढविण्यात आले आहेत असा आरोप देखील सदस्यांनी केला.
तर जिमखान्याची प्रतिमा डागळण्यासाठी हे केले जात असल्याची प्रतिक्रीया जिमखाना व्यवस्थापनाने मांडली आहे. सदस्य उपोषणाला बसल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. यावेळी कार्यकारीणी आणि सदस्य यांची लवकरच सर्वसाधारण सभा घेण्यात येऊन यावर तोडगा काढण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर हे उपोषण सदस्यांनी मागे घेतले.
डोंबिवली जिमखान्याचे सदस्य आणि भाजपचे माजी नगरसेवक राहूल दामले यांच्या नेतृत्वाखाली जिमखान्यातील अनेक सदस्य या उपोषणात सहभागी झाले होते. जिमखाना सदस्यांना विश्वासात न घेता खासगीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. जिमखान्यात प्रशिक्षण संस्था, खासगी प्रशिक्षक, संस्थांचे प्रशिक्षक नेमले ात आहेत. जिमखान्यातील व्यवहारांची कागदोपत्री माहिती मागवूनही ती दिली जात नाही.
सदस्यांनी याला आक्षेप घेतला आहे. समपचाराने चर्चा करण्यास सदस्य तयार आहेत, मात्र त्यास वेगळे वळण दिले जात आहे. एककल्ली कारभार करुन डोंबिवली जिमखान्याचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे. सार्वजनिक हित विचारात घेऊन जिमखाना चालविला गेला पाहीजे पण ते होत नसल्याने आम्ही उषोणाला बसल्याचे यावेळी दामले यांनी सांगितले. जलतरण तलावात बाहेरील विद्यार्थ्यांना नऊ वाजता प्रवेश द्यावा.
लाॅन टेनिस कोर्टाच्या ठिकाणी उत्सव काळात मंच दिले जातात. सभासद शुल्क सोळाशे रुपयांवरून सात हजार रुपये करण्यात आले आहे. त्या प्रमाणात सदस्यांना कोणत्या सेवा सुविधा दिल्या जातात अशा सदस्यांच्या काही मागण्या आहेत, त्याचा विचार केला जात नाही. शुल्क वाढवून कोणता हेतू साध्य केला जात आहे, असे प्रश्न दामले यांनी केले.
सदस्यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी मध्यस्थी करत कार्यकारीणी सोबत सदस्यांची चर्चा घडवून आणली. या चर्चेत लवकरच सदस्यांची एकत्रित बैठक एसजीएम बोलावून घेण्यात येईल असे आश्वासन मधुकर चक्रदेव यांनी दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
याबाबत जिमखान्याचे अध्यक्ष दिलीप भोईर म्हणाले, समन्वयाचा अभाव असल्याने गैरसमजूतीतून हा सर्व प्रकार घडला आहे. लवकरच कार्यकारिणी सदस्य, सभासदांची मिटींग घेत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.