मुंबई : सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु झाली आहे. यामध्ये फटाक्यांची आतषबाजी करणं हा अविभाज्य भाग बनला आहे. पण या काळात रस्त्यावर फटाके विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा विक्रेत्यांना मुंबई पोलिसांनी कडक करावाईचा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. (Mumbai Prohibition of sell firecrackers without license Police gives warning)
पोलीस उपायुक्त संजय लाटकर म्हणतात, मुंबईत रस्त्यावर विनापरवाना फटाके विकण्यास प्रतिबंध आहे. फटाके विकणे, त्याचे प्रदर्शन भरवणे, हस्तांतर करणे, वाहतूक करणे यांवर पोलिसांकडून बंदी घातलेली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर आणि विना परवाना फटाके विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. बेकायदा फटाके विकताना संपूर्ण काळजी घेतली जात नाही, त्यामुळं सार्वजनिक ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो किंवा फटाके पेटल्यास आग लागून मोठं नुकसानंही होऊ शकतं, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
बृहन्मुंबईच्या हद्दीत कोणालाही फटाके विकता येणार नाही. तसेच माहुल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलिअम, हिंदुस्तान पेट्रोलिअम बीडीयू प्लॉट एरिया, स्पेशल ऑईल रिफायनरी एरियाच्या १५ ते ५० एकर क्षेत्रात रॉकेट किंवा फटाके उडवू नयेत, असे आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. हा निर्णय १६ ऑक्टोबर २०२२ ते १४ नोव्हेंबर २०२२ या काळात लागू असेल, असंही पोलिसांनी आपल्या परिपत्रकातून स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.