mumbai sakal
मुंबई

Mumbai : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी वसई-विरार महापालिका आक्रमक

मालमत्ता कर वसुलीसाठी वसई-विरार महापालिकेने चांगलीच कंबर कसली असून यंदा ऑक्टोबर महिन्यापासूनच मालमत्ता सील करण्यास सुरुवात केली आहे

सकाळ वृत्तसेवा

विरार : मालमत्ता कर वसुलीसाठी वसई-विरार महापालिकेने चांगलीच कंबर कसली असून यंदा ऑक्टोबर महिन्यापासूनच मालमत्ता सील करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी अनधिकृत वाणिज्य मालमत्तांपैकी थकबाकी असलेल्या मालमत्ता सील करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली असून आतापर्यंत ४८९ मालमत्ता सील केल्या आहेत.

वसई-विरार महानगरपालिका चालू वर्षात मालमत्ता करवसुली १४२ कोटींची मालमत्ता कराची वसुली झाली आहे. मागील वर्षी ३२१ कोटींची वसुली झाली होती; मात्र यंदाच्या वर्षात विक्रमी करवसुली करण्यासाठी पालिका सज्ज झाली आहे. यासाठी पालिकेने थकबाकी असलेल्या अनधिकृत मालमत्तांना टार्गेट केले असून त्यांच्याकडून वसुली सुरू केली आहे. वसुलीसाठी मालमत्तादेखील सील करण्यात येत आहेत.

पहिल्या टप्प्यात पालिकेने आखलेल्या मोहिमेनुसार पालिकेने ६९९ वाणिज्य अनधिकृत मालमत्तांची तपासणी केली होती. या मालमत्तांकडून चार कोटी ९८ लाख रुपये कर भरणा अपेक्षित होता. त्यातील काही मालमत्तांनी कर भरणा केल्याने पालिकेला एक कोटी २३ लाखांचा कर प्राप्त झाला आहे; मात्र ६९९ पैकी ४८९ मालमत्तांनी अजूनही कर भरणा न केल्याने पालिकेने या अनधिकृत वाणिज्य मालमत्ता सील केल्या आहेत.

मोहीम लवकर सुरू

डिसेंबर महिन्यात मालमत्ता सील करण्यास सुरुवात करण्यात येते. याशिवाय पाणी जोडण्यादेखील खंडित करण्यात येतात; मात्र यंदा पालिकेने ही कारवाई ऑक्टोबर महिन्यातच सुरू केली आहे. यामुळे पालिकेला मालमत्ता कर वसुली करण्यास मोठी मदत मिळत असल्याचे पालिका कर संकलन विभागाने सांगितले.

मालमत्ता कर वसुली विक्रमी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करून मालमत्ता कराचा भरणा करावा.

- अनिलकुमार पवार. आयुक्त, वसई-विरार महापालिका

कर वसुलीसाठी वाणिज्य अनधिकृत मालमत्ता सील केल्या जात आहे. आतापर्यंत ४९८ मालमत्ता सील केल्या असून ही कारवाई सुरूच राहणार आहे.

- समीर भूमकर, उपायुक्त, वसई-विरार महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT