mumbai-pune expressway tanker accident 4 died 3 injured traffic update devendra Fadnavis  sakal
मुंबई

Mumbai-Pune Expressway : टँकरच्या अपघातानंतर मुंबई-पुणे वाहतूक ठप्प! ३ तासांपासून 'एक्सप्रेस वे'वर लांबच-लांब रांगा

रोहित कणसे

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात केमिकल टँकरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात आगीचा भडका उडाल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत परिसरही आगीने वेढला असून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार टँकर खूप वेगाने जात होता, तेव्हा अचानक ड्रायव्हरचा टँकरवरील ताबा सुटल्या आणि टँकर कोसळला. यानंतर टँकरमधील केमिकल बाहेर उडालं आणि आगीचा भडका उडाला. दुपारी ११ वाजून ५० मिनीटांनी झालेल्या या अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान अपघात झालेला टँकर उचलणारा क्रेन देखील जळून खाक झाला आहे.

वाहतूक तीन तासांपासून विस्कळीत

केमिकलने पेट घेतल्याने द्रुतगती मार्गावर आगीचे लोट पसरल्याने पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक विस्कळित झाली आहे. टँकर ने पेट घेतल्यानंतर आगीचे काही लोट पुलावरून खाली देखील पडले.

आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू असून मागील अडीच ते तीन तासांपासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक इतर पर्यायी मार्गानी वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहानांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. एक्सप्रेसवेच्या दोन्ही मार्गिकांवर प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे.

फडणवीसांनी मृतांना वाहिली श्रद्धांजली

मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT