mumbai railway 1100 crore provision for MUTP projects nirmala sitharaman sakal
मुंबई

Mumbai News : एमयूटीपी प्रकल्पांना ११०० कोटीची तरतूद; मुंबईतील रखडलेले प्रकल्प लागणार मार्गी

एमयुटीपी ३- ६५० कोटी रुपयांचा निधी !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगर पालिका निवडणुका लक्षात घेऊन मुंबईतील रेल्वे प्रकल्पासाठी अथर्मंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अथर्संकल्पात एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी १ हजार १०० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. गेल्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात एमयुटीपीच्या प्रकल्पांकरिता ५७५ कोटीचा निधी दिला होता.

मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे(एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेतले आहेत. अथर्मंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अथर्संकल्पात एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची भरीव तरतूद केली आहे. यंदाच्या अथर्संकल्पात एमयूटीपी २, एमयूटीपी ३ आणि ३ ए करिता निधी मंजूर केला आहे.

एमयूटीपी २ साठी १५० कोटी , एमयूटीपी ३ करता ६५० कोटी तर एमयूटीपी ३ ए मधील प्रकल्पांसाठी ३०० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे.केंद्र सरकारने दिलेल्या रक्कमेऐवढी रक्कम राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. त्यामुळे एमयूटीपीच्या प्रकल्पाला २२०० कोटी रुपये यंदा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांचे काम सुरू करणे एमआरव्हीसीला शक्य होणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतेही नविन प्रकल्प जाहिर न करता सुरु असलेल्या,रखडलेल्या किंवा याआधी परवानगी मिळालेल्या प्रकल्पांना निधी देण्यास प्राधान्य दिले आहे.निधी अभावी अनेक प्रकल्पांचे काम रेगाळले होते.एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे एमयुटीपीच्या प्रकल्पांना २६०० कोटी रुपयांचा निधी अथर्संकल्पात द्यावा अशी मागणी केली होती.त्यानुसार एमयुटीपीच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

एमआरवव्हीसीला मिळालेला निधी

२०२० -२०२१ - ५५० कोटी

२०२१-२०२२ - ६५० कोटी

२०२२- २३- ५७५ कोटी

२०२३- २४ - ११०० कोटी

रेल्वे मंत्रालयाने यंदाचा अर्थसंकल्पीय अनुदानात गेल्या वर्षीच्या तुलनेत 91 टक्के अधिक निधी दिला आहे. त्यामुळे एमयुटीपी प्रकल्पांना आणखी गती मिळणार आहे. जेथे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे अशा कामांना गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि एमयुटीपी 3 ए प्रकल्पांमधील भूसंपादन प्रक्रियाही जोमाने सुरू केली जाईल.

- सुभाष चंद गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

एमयुटीपी २- १५० कोटी

मुंबई सेंट्रल ते बोरीवली ६वा मार्ग, सीएसएमटी-कुर्ला५-६वा मार्ग.

एमयुटीपी ३- ६५० कोटी

विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल गाडया, रूळ ओलांडण्याचे प्रकार

एमयुटीपी ३ ए - ३०० कोटी

सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, २१० वातानुकूलित लोकल गाड्या, पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग, सीबीटीसी नवीन सिग्नल यंत्रणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT