AC-Local sakal media
मुंबई

मुंबई : उपनगरीय मार्गावर येणार 238 एसी लोकल

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागात (central and western railway) एसी लोकल (AC Train) धावत आहे. सध्या एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची (commuters) संख्या कमी असली तरी, भविष्यात एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकलवर 238 एसी लोकल धावणार आहे. यासंदर्भात रेल्वे मंडळाच्या (railway division) उच्चस्तरीय बैठकीत 238 एसी लोकल प्रस्तावाला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. मात्र, अंतिम निर्णय (final decision) रेल्वे मंडळाकडून (railway authorities) घेणे अपेक्षित आहे.

मुंबई रेल्वे विकास काॅर्पोरेशन (एमआरव्हीसी)च्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) 3 आणि एमयूटीपी 3 ए अंतर्गत 238 एसी लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. एमयूटीपी 3 मध्ये 47 आणि एमयूटीपी 3 ए मध्ये 191 एसी लोकल 2024 पर्यंत खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नाॅन एसी लोकल येत्या काळात खरेदी केल्या जाणार नाही, अशी माहिती एमआरव्हीसी अधिकाऱ्यांनी दिली.

लोकलच्या दरवाज्याला लटकणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. यामुळे धावत्या लोकलमधून पडणारे, लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करताना बाहेरील खांबाचा फटका लागणे असे अपघात होतात. परिणामी, नाॅन एसी लोकलएवजी एसी लोकल खरेदी केल्या जाणार आहेत. कारण एसी लोकलचे दरवाजे स्वयंचलित असून फक्त लोकल स्थानकात आल्यावर उघडतात आणि बंद होतात. त्यामुळे धावत्या लोकलमधून पडून अपघात होणार नाही. तर, सध्या मेट्रोचे प्रति तीन किमीला 60 रुपये भाडे आकारले जात आहे. हे भाडे प्रति तीन किमीला 10 रुपये आकारले जाण्याचा प्रस्ताव आहे. तर, एसी लोकलची संरचनाही मेट्रोसारखी करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती एमआरव्हीसी अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Candidate List: माणमध्ये गोरेंच्या विरोधात नवा उमेदवार, पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर

Swapna Patkar: संजय राऊतांवर गंभीर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर निवडणुकीच्या रिंगणात; 'या' मतरसंघातून दाखल करणार अर्ज

Alzheimer's Disease : खुशखबर! अल्झायमरवर इलाज सापडला, पुण्याच्या शास्त्रज्ञांनी केला चमत्कार; असा लागला शोध!

Assembly Election: पवारांची ५७ वर्षांची परंपरा युगेंद्र पवार सुद्धा पाळणार! काय आहे कान्हेरी मारुतीचे बारामतीच्या निवडणुकीशी कनेक्शन?

Latest Maharashtra News Updates : चोपड्यातून ठाकरे गटाचा उमेदवार बदलला

SCROLL FOR NEXT