Mumbai Rain  
मुंबई

Mumbai Rain : हृदयद्रावक! चार महिन्याचे बाळ आजोबांच्या हातून निसटून थेट नाल्यात; बाळाचा शोध सुरूच

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला. रेल्वे सेवा संथगतीने सुरु असल्याने डोंबिवली ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या. याच दरम्यान ठाकुर्ली जवळ एक हृदयद्रावक घटना घडली. लोकलसेवा ठप्प असल्याने वडील आणि मुलगी चार महिन्यांच्या चिमुरडीसह रेल्वे रुळांवरुन चालत जात होते.

नाल्यावरुन ते प्रवास करत असताना आजोबांचा तोल गेला आणि त्यांच्या हातातील चार महिन्यांची चिमुरडी थेट नाल्यात पडली. पाण्याचा प्रवाह एवढा होता की काही क्षणांत ती नजरेच्या आड झाली. मुलगी पाण्यात पडताच त्या माऊलीने टाहो फोडला तो साऱ्यांचाच हृदय पिळवटणारा ठरला. रेल्वे पोलिस, अग्निशमन दल आणि शिवसेना आपत्ती व्यवस्थापन पथक या मुलीचा अद्याप शोध घेत आहेत.

अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रुळांवर पावसाचे पाणी साचले आणि त्याचा फटका मध्य रेल्वेला बसला. मध्य रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु असल्याने डोंबिवली ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलच्या रांगा लागल्या होत्या. लोकल बराच वेळ एकाच जागी उभ्या असल्याने अनेक प्रवाशांनी रुळांवरुन चालत स्टेशन गाठण्याचा प्रयत्न केला.

भिवंडी येथे राहणाऱ्या योगिता रुमाले या वडिल ज्ञानेश्वर यांच्यासोबत अंबरनाथ लोकलने प्रवास करत होत्या. आपल्या ऋषिता या चार महिन्यांच्या चिमुरडीला घेऊन त्या वडिलांसोबत मुंबईला दवाखान्यात गेल्या होत्या. तेथून परतताना त्या अंबरनाथ लोकलने प्रवास करत होत्या. त्यांची लोकल ठाकुर्लीच्या पुढे आली आणि जाग्यावर थांबली.

एक ते दोन तास लोकल जाग्यावर उभी असल्याने इतर प्रवाशांप्रमाणे त्यांनी उतरुन रुळावरून चालत कल्याण रेल्वे स्थानक गाठण्याचे ठरवले. ठाकुर्ली येथील नाल्यावरुन जात असताना आजोबा ज्ञानेश्वर यांचा तोल गेला आणि त्यांच्या हातून चिमुरडी निसटून थेट नाल्याच्या पाण्यात पडली. मुलगी पडताच वडील आणि मुलीने एकच हंबरडा फोडला. त्यांचा ओरडा ऐकून प्रवाशांनीही लागलीच मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बाळ क्षणात दिसेनासे झाले.

घटनेची माहिती मिळताच तासाभरात कल्याण व डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. स्थानिक कोळी बांधव, शिवसेना आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या सहाय्याने बाळाचा शोध सुरु करण्यात आला. या घटनेला चार ते पाच तास उलटले असून अद्याप बाळाचा शोध लागलेला नाही.

योगिता या हैद्राबाद येथे वास्तव्यास असून त्या डिव्हलरीसाठी भिवंडी येथे आई-वडीलांकडे आल्या होत्या. बुधवारी बाळाचे चेकअप असल्याने आई व आजोबा बाळाला घेऊन मुंबई येथील रुग्णालयात गेले होते. तेथून परतत असताना त्यांनी अंबरनाथ लोकल पकडली. डोंबिवली ते कल्याण दरम्यान एक ते दोन तास लोकल उभी असल्याने त्यांनी रेल्वेतून उतरुन पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. ठाकुर्ली जवळील नाला जवळून ते जात असताना ही दुर्घटना घडली. रेल्वे पोलीस आणि अग्निशमन दलाकडून नाल्यात पडलेल्या चार महिन्याच्या बाळाचा शोध सुरू आहे.

NDRF ची टीम पोहचली नसल्याचा नागरिकांचा आरोप...

एनडीआरएफची टीम तिथे पोहोचली नाही. इतकेच नव्हे तर फायर ब्रिगेडही वेळेत पोहचली नाही. अशी येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी माहिती दिली.

आईचा आक्रोश पाहून पाणावले इतरांचे डोळे...

आपल्या पोटचा गोळा पाण्यात पडल्याचे समजताच ती माय तर धाय मोकलून रडू लागली. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी ती अक्षरशः त्या नाल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती. तर हा सगळा प्रसंग घडत असताना तो पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच अश्रूंचा बांध फुटला. त्या आईच्या आर्त किंकाळीने सर्वांचेच काळीज अक्षरशः पिळवटून टाकले.

तो फोटो ठाकुर्ली मधील नाहीच, बाळ मिळाले नाहीं....

दरम्यान संध्याकाळी बाळ सापडल्याची अफ़वा पसरली आणि दोन फोटो व्हायरलं झाले. मात्र ते ठाकुर्लीतील नसल्याचे उघड झाले आहे. अद्यापही मुलीचा शोध सुरु आहे. लोकलसेवा रखडल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी रस्ते मार्गाने पर्यायी व्यवस्था न केल्याने रुळांवरुन चालत स्टेशन गाठण्याची वेळ प्रवाशांवर ओढावली होती.

ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्याने प्रवास करणाऱ्या रिक्षा चालकांनी याचा फायदा घेत पटरीवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्येच अडवून रिक्षाची सुविधा दिली. त्यांच्याकडून कल्याण रेल्वे स्थानक गाठण्यासाठी 50 ते 100 रुपये दर आकारले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT