मुंबई : मागाठाणे स्थानकाला लागून असलेला महापालिकेचा रस्ता खासगी विकासाच्या चुकीमुळे खचला. गेल्यावर्षीच हा रस्ता मागाठाणे मेट्रो स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांसाठी सुस्थितीत आणण्यात आला होता. मात्र खासगी विकासकाने इमारत बांधण्यासाठी खोदकाम केले यामध्ये हा रास्ता खचला. यामुळे मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या प्रवेश आणि निकासात काही तात्पुरते बदल करण्यात आले असल्याची माहिती एमएमएमओसीएलने दिली आहे.
पश्चिम द्रुतगतीमार्ग बोरीवली येथील मेट्रोच्या मागाठाणे स्थानकाजवळ सी. सी.आय प्रोजेक्ट्स प्रा.लि. या विकासकाच्या रिव्हर्ली पार्क प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान खोदकाम करण्यात येत आहे. हे खोदकाम करत असताना भूस्खलन होऊ नये म्हणून सुरक्षतेच्यादृष्टीने संरक्षण भिंत उभी करने अपेक्षित असते. मात्र असे न झाल्याने महानगरपालिकेचा रस्ता खचला.
सदर प्रकल्पाला लागूनच मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे मागाठाणे स्थानक आहे. त्यामुळे हे भूस्खलन सातत्याने झाले तर मेट्रोचे मागाठाणे स्थानक हे ढासळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, मेट्रोच्या खांबानांही धोका निर्माण झाला आहे.
मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गात काही तात्पुरते बदल करण्यात आले असल्याची माहिती एमएमओसीएलने दिली आहे. मागाठाणे स्थानकाच्या उत्तरेकडील जिना आणि सरकता जिना प्रवेश तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
उत्तरेकडील उद्वाहक (लिफ्ट) बंद ठेवण्यात आली आहे. बाधित जागेकडील कॉनकोर्सचा भागही प्रतिबंधित करण्यात आला आहे. बाहेर पाडण्यासाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घ्या. मेट्रो सेवेवर याचा कोणताही परिणाम झाली नाही, अशी माहितीही एमएमसीएलने सोशलमिडीयावरून दिली आहे.
एमएमआरडीए आणि बीएमसी यापुढे माती कोसळू नयेत यासाठी उपाय योजना राबवत आहेत. बीएमसीने काम थांबवण्याची नोटीस बजावली असून बिल्डरविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएमसीएलद्वारे सतत देखरेख आणि आवश्यक कृती केल्या जात आहेत. "पुढील नुकसान टाळण्यासाठी परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देणे अत्यावश्यक आहे, कारण एमएमआरडीए, एमएमएमसीएल आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी एकत्रित पाहणी केली. यातून आम्ही निष्कर्ष काढला आहे की, मेट्रो सेवा सुरु ठेवण्यासाठी कोणताही धोका नाही", एमएमएमओसीएल अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.