Mumbai Rain Update: sakal
मुंबई

Mumbai Rain Update: बारवी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivali | बारवी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता धरणातील पाणी पातळी ही 67.70 मीटर झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे येत्या काही दिवसांत धरणावरील स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, नदीच्या पात्रात उतरण्यास पर्यटकांना बंदी आदी सूचना तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर कराव्यात असे पत्र एमआयडीसीने तहसीलदार यांना पाठविले आहे.

एमआयडीसीच्या बारवी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. बारवी धरण तसेच धरणक्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता धरणातील पाणी पातळी 67.70 मी. एवढी असून बारवी धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात

येणारा पाण्याचा स्रोत संभाव्य थोडा वाढला आहे. त्यामुळे बारवी धरणाची पातळी वाढुन बारवी धरणाचे स्वयंचलीत वक्रद्वारे (गेट) येणाऱ्या काही दिवसात उघडण्याची शक्यता आहे. परिणाम स्वरुप बारवी धरणातुन बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

होईल. तरी कृपया बारवी नदीकाठच्या विशेषतः आस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटील पाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली व नदी काठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा तसेच गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी गांवातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत

असले बाबत सतर्कतेच्या सूचना देण्याची विनंती एमआयडीसी ने केली आहे. तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांना व

पर्यटकांना प्रवेश न देणेबाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करणेबाबत सूचना आपले स्तरावरुन देण्यात याव्यात अशी विनंती अंबरनाथ एमआयडीसी बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंतादुशांत उईके यांनी कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड तहसीलदार यांना पत्र पाठवून केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT