mumbai rain update Chemical water from Badlapur MIDC area directly into Ulhas river donbivali sakal
मुंबई

Mumbai Rain Update : पावसाच्या आड बदलापूर एमआयडीसी क्षेत्रातील केमिकलचे पाणी थेट उल्हास नदीत

बुधवारच्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी देखील बदलापूर शहरात पावसाने जोर

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - गेले दोन दिवस सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा आडोसा घेत रासायनिक कारखान्यातील रासायनिक सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याची घटना समोर आली आहे.

बदलापूर एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी येथील कारखानदारांनी थेट उल्हास नदी व रस्त्यावर सोडून दिल्याचे चित्र जागोजागी पहायला मिळाले. या भागातील कारखानदारांना एमआयडीसीचे अधिकारी संरक्षण देत असल्यामुळे कारखानदार असे कृत्य करत असल्याचे बोलले जात आहे. याविषयी एमआयडीसी अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.

बुधवारच्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी देखील बदलापूर शहरात पावसाने जोर धरला होता. या पावसाच्या पाण्यासोबत एमआयडीसीचे सांडपाणी थेट उल्हास नदी सोडण्याचा प्रकार समोर आला आहे.

बदलापुरातील रासायनिक कारखानदारांना त्यांचे सांडपाणी पाईपलाईनद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पाठवणे बंधनकारक आहे. मात्र या पाईपलाईन सतत फुटत असताना एमआयडीसीचे अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

एवढेच नव्हे तर गुरुवारी बदलापूर एमआयडीसी भागामध्ये अनेक कारखानदारांनी आपल्या कंपनीतील रासायनिक सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले होते, तर काही कारखानदाराने हे सांडपाणी थेट उल्हास नदीच्या पात्रात सोडले.

उल्हास नदी भरून वाहत असल्यामुळे त्यात कोणताही परिणाम दिसत नसला तरी बदलापुरातील कारखानदार रासायनिक सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडत असल्याने त्यांच्या या बेजबाबदारपणावर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

उल्हास नदीतून अंबरनाथ आणि बदलापूर शहराला पाणीपुरवठा केला जात असताना कारखान्यातील सांडपाणी थेट नदीत सोडणे हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

तर दुसरीकडे या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट कारखान्यातील सांडपाणी रस्त्यावर सोडण्यात येत असल्याची बाब एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून दिसत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT