mumbai rain update Dombivli Post Office like flood condition water pumping Sakal
मुंबई

Dombivli Rain News : डोंबिवली पोस्ट ऑफिसला पाण्याने वेढले; पाणी उपसा पंप केवळ दिखावा

कल्याण डोंबिवली शहरात सकाळ पासून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले होते. डोंबिवली एमआयडीसी मधील टपाल आणि पारपत्र कार्यालयाला देखील पावसाच्या पाण्याने वेढले गेले आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरात सकाळ पासून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले होते. डोंबिवली एमआयडीसी मधील टपाल आणि पारपत्र कार्यालयाला देखील पावसाच्या पाण्याने वेढले गेले आहे.

कार्यालयाच्या चारही बाजूने पाणी साचल्याने परिसर जलमय झाला आणि कर्मचारी तसेच कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत ये जा करावी लागत आहे. याठिकाणी कायम पाणी साचत असून त्यावर उपाय म्हणून पाणी उपसा करणारा पंप प्रशासनाने येथे लावला आहे. मात्र तो केवळ दिखावा आहे का ? असा प्रश्न हा बंद असलेला पंप पाहून उपस्थित केला जात आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. या बांधकामाचा राडारोडा तसेच शहराच्या इतर भागातून येणारा राडारोडा हा एमआयडीसी मधील मोकळ्या जागेत टाकला जातो.

dombivli post office rain

काम करणारे ठेकेदार हा राडारोडा उचलावा लागू नये म्हणून लगतच असलेल्या नाल्यात ढकलून देतात. यामुळे अनेक ठिकाणी नाल्याचे नैसर्गिक प्रवाह बंद झाले असून पाणी तुंबल्याच्या घटना घडतात. येथील पोस्ट ऑफिस कार्यालय परिसरात दरवर्षी आणि प्रत्येक पावसात गुडघाभर पाणी साचते. याकडे

एमआयडीसी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. टपाल कार्यालय आवार जलमय झाल्याने कर्मचारी येथे येणारे नागरिक यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागले. किरकोळ पावसात देखील ही परिस्थिती उदभवत असल्याने मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर टपाल कार्यालयात पाणी घुसण्याची शक्यता परिसरातील नागरिक, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

या ठिकाणी पाणी साचत असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाणी उपसा पंप ठेवण्यात आला आहे. मात्र तो बंद असून सकाळी गुडघाभर पाणी कार्यालय आवारात साचले होते. यामुळे हा पंप केवळ दिखावा म्हणून उभा केला आहे का ? असा सवाल नागरिक करत आहेत.

एमआयडीसी अधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील नाल्यांची पाहणी करुन नाले बुजवून बांधकाम करणाऱ्या, नाल्यांमध्ये भराव टाकणाऱ्या ठेकेदार, विकासकांवर कारवाई करण्याची मागणी एमआयडीसीतील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र या तक्रारिंकडे एमआयडीसी प्रशासन कायम दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

dombivli post office rain

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT