Mumbai Rain Update heavy rain in city and suburbs districts of Mumbai Thane and Palghar  
मुंबई

Mumbai Rain Update : आजही पाऊस झोडपणार! मुंबई, ठाण्यासह पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

रोहित कणसे

मागचे काही दिवस मुंबईत जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबईसह परिसरात मुसळधार पावासाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि परिसरा पावसाने गुरुवारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबईमध्ये पाऊस सक्रिय झाला होता. दरम्यान हवामान विभागाने आज, शनिवारी पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.

काही दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसाचा फटका रस्ते वाहतूक आणि लोकल रेल्वेसेवेवर देखील पाहायला मिळात आहे. यादरम्यान आज सकाळी ८ वाजता जारी केलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD मुंबईने याबद्दलचा इशारा दिला आहे.

मागील २४ तासात झालेल्या पावसाची नोंद

मुंबई शहर- ४६.९३ मिमी.

पूर्व उपनगरे- ८३.६८ मिमी.

पश्चिम उपनगरे- ८३.७० मिमी.

भरती-ओहटी वेळा

मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

भरती - सकाळी - १०:२९ वाजता - ४.१६ मीटर

ओहोटी - दुपारी - ०४:२२ वाजता - ०२.१६ मीटर

भरती - रात्री - १०:१३ वाजता - ३.६१ मीटर

ओहोटी - (उद्या ०२.०७.२०२३) पहाटे - ०४:१८वाजता - ०.५४ मीटर

दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईसह ठाणे, पालघर, नालासोपारा, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार मुसंडी मारली आहे. काही ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरांची पडझड होऊन ऐन पावसात संसार उघड्यावर आले आहेत. अलिबाग, मोखाडा, वसईतील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. झाडे पडून अनेक घरांचे व वाहनांचे नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT