Mumbai Rain Update sakal
मुंबई

Mumbai Rain Update: 'कोसळधार'मुळे मुंबई मंदावली; रस्ते, पूल पाण्याखाली अन् शाळांना सुट्टी

सकाळ वृत्तसेवा

Mumbai: संतत धारेने मुंबईची दमछाक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून आज मुंबईला झोडपून काढले. पहाटेपासून पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई आणि उपनगरातल्या सखल भागात पाणी साचले. पावसामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला. रस्त्यावर पाणी साचल्याने द्रूतगतीमार्गावर वाहतूक कोंडी झाली.

सायन येथील गांधी मार्केट, चुनाभट्टी, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, चेंबूर आदी सखल भागात पाणी साचले. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दुपारी समुद्राला भरती व हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जाहिर केल्याने दुपारी मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली.

दरम्यान हवामान विभागाने उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहिर केला असून मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

जून महिना कोरडाच गेला. त्यामुळे तलावांनी तळ गाठल्याने मुंबईकरांना पाणी कपातीलाही सामोरे जावे लागले. मात्र जुलै महिना सुरु झाला आणि पावसाने दमदार हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडतो आहे.

आज पहाटेपासून पावसाने संततधार सुरु करीत धुवॉंधार कोसळला. सायन, गांधी मार्केट, धारावी, मालाड, बोरीवली, कांदिवली, चुनाभट्टी, गांधी मार्केट, दादर टीटी, वांद्रे, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, लालबाग, परळ, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर शेल क़ॉलनी, वाशीनाका, गोवंडी, मानखुर्द, अंधेरी सबवे, विक्रोळी, भायखळा, वडाळा आदी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक मंदावली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाल्याने वाहतूक कोंडी झाली. बेस्ट बसेसची वाहतूक वळवण्यात आली. सकाळच्या गर्दीच्यावेळी रेल्वेसेवा उशिराने धावल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला.

रस्ते वाहतूकीवरही परिणाम झाल्याने वाहतूक कोंडीत अनेकांना अडकावे लागल्याने कामाच्या ठिकाणी विलंब झाला. दुपारी समुद्राला भरती होती. समुद्रात ४.६२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार होत्या. साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा व त्य़ाचवेळी मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याची भीती असते. तसेच हवामान विभागाने दुपारी पावसाचा रेड अलर्टही जाहिर केल्याने सुरक्षिततेच्यादृष्टीने दुपारी मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली.

उशिरा सुट्टी जाहिर करण्यात आल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या सत्रासाठी शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी बाहेर पडलेल्या विद्यार्थी, पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

तलाव क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावातील पाणीसाठाही हळू हळू वाढू लागला. सात तलावांपैकी आतापर्यंत चार तलावे भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे तलावांत पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांहून अधिक उपलब्ध झाला आहे. समाधानकारक पावसामुळे सोमवारपासून पालिकेने मुंबईकरांचे १० टक्के पाणी कपात मागे घेण्याचा निर्मय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

.

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार तसेच हवामान विभागाने रेड अलर्ट जाहिर केल्यानंतर मुंबई महापालिकेने दुपारी सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली. सकाळच्या सत्रातील शाळा सुरु होत्या. दुपारच्या सत्रासाठी विद्यार्थी शाळांत जाण्यासाठी निघाले, काही शाळा, महाविद्यालयातही पोहचले. मात्र दुपारी सुट्टी जाहिर केल्याने सकाळच्या व दुपारच्या सत्रातीलही विद्यार्थी, पालकांची धावपळ उडाली.

.......

समुद्राला उधाण

सकाळपासून धो धो कोसळत पावसाने मुंबईकरांना जोरदार तडाखा दिला. सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. त्यात दुपारी समुद्राला भरती होती. दुपारी २.५१ वाजता ४.६२ मीटर उंचीच्या लाटा उसळल्याने समुद्राला उधाण आले होते. मुसळधार पाऊस आणि समुद्राला उधाण आल्याने सुरक्षिततेच्यादृष्टीने चौपाट्या, समुद्र किनारी नागरिकांना मनाई करण्यात आली होती. येथे लाइफ गार्ड व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते.

...........

पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा

मुसळधार पावसामुळे मुंबईतील पाणी साचणा-या ठिकाणी पालिकेची यंत्रणा सज्ज होती. सखल भागात पाणी साचलेल्या ठिकाणी२५५ पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करण्यात आला. मॅनहोल्सच्या ठिकाणीही पालिकेचे लक्ष होते. काही ठिकाणी मॅनहोल्सची झाकणे उघडून पाण्याचा निचरा केला. पाणी साचणा-या ठिकाणी पालिकेने अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आला होता.

...........

बसेसचा मार्ग वळवला

मुसळधार पावसामुळे वांद्रे कलानगर येथील मातोश्री बंगल्याजवळील मार्गावर सकाळी झाड उन्मळून पडले. त्यामुळे तेथील वाहतूक बंद करावी लागली. या मार्गावरील बसमार्ग क्रमांक ११ म . ८७ म . २१५ , २५५ म , ३१६ , ३१७ ,हे . दोन्ही दिशांनी सकाळी ६ वाजल्यापासून पश्चिम द्रुतगती महामार्गाने खेरवाडी जंक्शनमार्गे वाहतूक वळवण्यात आली. आरे वसाहतीतील युनिट क्रमांक २२ येथे पाणी साचल्याने सकाळी ६ . ५० वाजल्यापासून येथील बसमार्ग ए १८६ साकीनाका मार्गे तर ४६० म व ४८९ म . दोन्हीही दिशांनी जे व्ही एल आर, सिपझ गांव , विजय नगर , पिकनिक पॉईंट मार्गे परावर्तीत करण्यात आले. तसेच वांद्रे एस व्ही रोड येथे सकाळी पाणी साचल्याने बस क्रमांक सी १ . ४ म , ३३ . ८३ , ८४ म . ए २०२ , २४१ . २५५ म हे बसमार्ग सकाळी ९. १५ वाजल्यापासून सकाळी १०. १५ वाजेपर्यंत लिंकिंग रोड मार्गे वळवण्यात आले. तर कुर्ला शीतल तलाव येथे पाणी साचल्याने ७ म , सी ३०२ , ३०३ , ३२२ ५१७ हे बसमार्ग मगन नाथू मार्ग व काळे मार्गाने परावर्तीत करण्यात आले.

तसेच पाण्याची पातळी वाढल्याने ७ म , सी ३०२ व ३०३ हे बसमार्ग श्रेयस सिनेमा, पूर्व द्रुतगती मार्ग , सांताक्रूझ चेंबूर जोड मार्गाने कुर्ला आगार येथे वळवण्यात आले. भांडुप पश्चिम येथील तुलशेत पाडा मार्गावर हनुमान मंदिराजवळ एक वृक्ष कोसळला व वाहतूक बंद झाली. त्या मार्गावर धावणारी ६०७ क्रमांकाची बस बंद करावी लागली. दुपारी १२.२५ वाजता त्या बसमार्गावरील बसेस सुरु करण्यात आल्या.

............

कोस्टल रोडवर अपघात

कोस्टल रोडवर गुरुवारी खाजगी वाहनांचा अपघात झाला. त्यामुळे सकाळी १०.३० वाजल्यापासून डाऊन दिशेत रस्ता बंद करण्यात आला. दुपारनंतर मात्र वाहतूक सुरु करण्यात आली.

.........

येथे भरले पाणी

मुसळधार पावसामुळे सायन, गांधी मार्केट, धारावी, मालाड, बोरीवली, कांदिवली, चुनाभट्टी, गांधी मार्केट, दादर टीटी, वांद्रे, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, लालबाग, परळ, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर शेल क़ॉलनी, वाशीनाका, गोवंडी, मानखुर्द, अंधेरी सबवे, विक्रोळी, भायखळा, वडाळा आदी सखल भागात पाणी साचले.

...........

आज ऑरेंज अलर्ट

पावसामुळे आज सखल भागात पाणी साचले. हवामान विभागाने दुपारी पावसाचा रेड अलर्ट जाहिर केला. शुक्रवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहिर करण्यात आला असून येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT