mumbai rain update road pothole citizen criticize engineers official social media road construction sakal
मुंबई

Mumbai Rain Update : पावसाची उघडीप तरीही खड्डे जैसे थे... अधिकाऱ्यांवर समाज माध्यमातून टिकेची झोड

अभियंत्यांचा दुचाकीवरुन प्रवास कशासाठी ? नागरिकांचा संतप्त सवाल

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - पावसाळ्यापूर्वी खड्डे भरणी, रस्ते दुरुस्तीची कामे योग्य रितीने न झाल्याने पहिल्याच पावसात पालिकेच्या कामाची पोलखोल झाली. पावसामुळे रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली असून अधिकाऱ्यांवर टिकेची झोड समाज माध्यमातून उठविली जात आहे.

पावसाने उघडीप देताच पालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दुचाकीवरुन शहरातील रस्त्यांची पाहणी केली. पावसाने उघडीप दिल्याने त्वरीत खड्डे भरणीची कामे करावीत तसेच या कामात हलगर्जी पणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचा इशारा दिला आहे.

मंगळवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यानंतरही डोंबिवली शहरात खड्डे भरणीची कामे दिसून आली नाहीत. रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असून अभियंत्यांचा दुचाकीवरुन प्रवास कशासाठी ? या ठेकेदारांवर कारवाई होणार का ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वीची खड्डे भरणीची कामे अनेक भागात पालिकेच्या ठेकेदारांकडून पूर्ण करण्यात आली नव्हती.

तसेच ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांचे डांबरीकरण व खड्डे भरणी करण्यात आल्याने पावसाळ्यात हे डांबर वाहून जाऊन रस्त्यांवर खड्डे पडले. पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्यांची ही अवस्था झाल्याने पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर टिकेची झोड समाज माध्यमातून उमटली गेली. रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास वाहन चालकांसह नागरिक आणि प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे.

कल्याण मध्ये कोळसेवाडी, काटेमानिवली, चिंचपाडा, नेवाळी नाका, मलंगगड रोड, मुरबाड रोड, मोहने आंबिवली रोड, टिटवाळा, बल्याणी, वसंत व्हॅली यांसह डोंबिवलीतील गणेशनगर, गरिबाचा वाडा श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी रस्ता,

रेतीबंदर, सत्यवान चौक, सुभाष रोड, उमेश नगर, टिळक रोड, पेंढरकर कॉलेज रोड, घरडा सर्कल, दत्तनगर, सुनील नगर, आयरे गाव रोड, एमआयडीसी, 27 गावातील सर्व डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे भरणीच्या कामासाठी पालिकेने 20 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. 10 प्रभागांच्या हद्दीत रस्त्यावर पडणारे खड्डे या निधीतून भरण्यात येणार आहे.

पालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सोमवारी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, उपअभियंता शाम सोनावणे, कनिष्ठ अभियंता संजय आचवले यांच्यासोबत दुचाकीवरुन प्रवास करत चक्क खड्ड्यांची पहाणी केली आहे.

पावसाने विश्रांती घेतल्याने या कालावधीत खड्डे तात्काळ कॉंक्रीट मिश्रणाने भरण्याच्या सूचना अहिरे यांनी ठेकेदारांना केल्या आहेत. भरणीच्या कामावर प्रभागातील अभियंत्यांनी लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या असून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा शहर अभियंता अहिरे यांनी दिला आहे. खड्डे आता कधी भरले जातात हे आता पहावे लागेल.

सोमवारी दुचाकीवरुन अभियंत्यांनी प्रवास केला खरा, परंतू मंगळवारी डोंबिवली शहरातील मुख्य रस्त्यांवर कोठेही खड्डे भरणीची कामे सुरु असल्याचे दिसून आले नाही. पावसाने उघडीप घेतली असून कडकडीत ऊन पडल्याने कॉंक्रीट मिश्रण सुकण्यास वेळ असूनही ठेकेदार काम करत नसल्याचे चित्र शहरात दिसून आले.

तसेच पुन्हा पाऊस येण्याची वाट पालिका अधिकारी, कंत्राटदार पहात आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्यावर्षी खड्ड्यांमुळे केडीएमसीतील पालिकेचे अधिकारी टिकेचे लक्ष झाले होते. त्यामुळे तात्कालीन शहर अभियंता सपना कोळी यांना त्याचा फटका बसला होता. यातून धडा घेऊन तत्कालीन शहर अभियंता अर्जुन अहिरे काय करतात हे पहावे लागेल.

मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेवरून आवाज उठविला होता. केडीएमसी मधील रस्त्यांची देखील दुरवस्था असून ते याविषयी देखील आवाज उठवितात का ? हे आता पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT