Mayor-Vs-Central-Railways 
मुंबई

महापौर मॅडम, आम्ही आमचं काम चोख करतो; 'रेल्वे'चं सडेतोड उत्तर

Mumbai Rains: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि रेल्वे प्रशासनात खडाजंगी

विराज भागवत, कुलदीप घायवट
  • Mumbai Rains: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि रेल्वे प्रशासनात खडाजंगी

मुंबई: पहिल्याच मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) मुंबईची तुंबई झाली. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने रेल्वे सेवा (Mumbai Local Trains) कोलमडून पडली. त्यामुळे दिवसभर प्रवाशांना (Commuters) नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र, पहिल्याच पावसात (Mumbai Rains) रेल्वे सेवा खोळंबल्याने रेल्वे (Central Railways) आणि महापालिकाने (Mumbai BMC) नालेसफाई पूर्ण केल्याचा दावा फोल ठरला आहे. यावरून महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी रेल्वे प्रशासनाबाबत खडे बोल सुनावले. तर, मध्य रेल्वेने महापौरांच्या आरोपांचे खंडन करून ट्विटरवरून आपली बाजू स्पष्ट केली. (Mumbai Rains Mayor Kishori Pednekar vs Central Railways Twitter War over Water logging)

बुधवारी मुंबईत पाणी साचल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. तर, कुर्ला-सायन, मानखुर्द-वडाळा, वांद्रे येथे पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारले असताना, त्यांनी सांगितले की, रेल्वे रूळ स्वच्छता, नालेसफाई करण्याबाबत रेल्वेकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले. त्यानंतर मध्य रेल्वेकडून त्यांचे खंडन करण्यात आले. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, रेल्वे सहकार्य करीत नाही, या आरोपाचे खंडन करतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने बैठका घेत असतो. जेणेकरून प्रवाशांना उत्तम सेवा देऊ शकू, असे सुतार म्हणाले.

त्यानंतरही मध्य रेल्वेच्या अधिकृत टिट्वर खात्यावरून मुंबईतील पाणी साचल्याच्या घटनांची माहिती देण्यात आली. तब्बल सहा ट्वीट करून मध्ये रेल्वेने महापौरांच्या आरोपांचे खंडन केले आणि आम्ही आमचं काम नीट व चोख करतो, असं ठणकावून सांगितलं.

मंबई पालिका आणि इतर संबंधित प्रशासन व्यवस्थांशी आमचे कर्मचारी सतत संपर्कात होते. पावसामुळे वाढत जाणाऱ्या पाण्याच्या पातळीचे अपडेट्स मध्य रेल्वेकडून घेतले जात होते. नायर रुग्णालय, वडाळा लायब्ररी जंक्शन, षण्मुखानंद हॉल परिसर, सायन पुल व इतर परिसरात पाणी साचल्याने रेल्वे स्थानकात पाणी भरले, असं सडेतोड उत्तर रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT