Mumbai Rains marathi news esakal
मुंबई

Mumbai Rains: विकास झाला भकास! दोन महिन्यापूर्वी केलेला मुंबईतील रस्ता पावसाने गेला वाहून...

Sandip Kapde

मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्वेकडील अंधेरी सभेला जोडणारा जो मुख्य रस्ता आहे, तो रस्ताच मुसळधार पावसात वाहून गेला आहे.

हा रस्ता दोन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आला होता. नागरिकांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात आवाजही उठवला होता. आज हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली वाहून गेल्याने रस्त्याच्या कामावर नागरिकांनी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

अंधेरी सबवे जलमय-

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी मुंबईतील अनेक सखल भाग हे जलमय झाले आहेत. अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला आहे आणि सध्या अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सबवे मध्ये पाच फुटापर्यंत पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. याच परिसरातून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला हा आढावा आहे.

मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांना फटका, अधिवेशनासाठी निघताना अडकले

मुसळधार पावसामुळे अनेक आमदार अधिवेशनासाठी निघताना अडकले आहेत. विदर्भ आणि अमरावती एक्सप्रेस कुर्ला, घाटकोपरदरम्यान अडकल्या आहेत. यात १० ते १२ आमदार अडकले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि मंत्री अनिल पाटील हे ट्रँकनं चालत बाहेर निघाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Whatsapp Username Feature : मोबाईल नंबर नसतानाही व्हॉट्सॲपवर करता येणार चॅटिंग; काय आहे युजरनेमचं भन्नाट फीचर?

Mumbai Local: नवीन वेळा पत्रामुळे रेल्वे प्रवाशांची दाणादाण!

Bigg Boss Marathi 5 : "हा अन्याय आहे..." व्होटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक बदल ; प्रेक्षकांचा मेकर्सवर घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT