Suresh Devbhakt passed away Vasai esakal
मुंबई

Suresh Devbhakt : मुंबईचे रणजीपट्टू सुरेश देवभक्त यांचं निधन; वसई-विरारमधील 'दादा' क्रिकेटपटू हरपला

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील क्रिकेट मैदाने आपल्या घणाघाती फलंदाजीने आणि अचूक टप्प्यावरील ऑफ कटर्सने गाजवलेल्या या देवभक्तला बडोदे संघाविरुद्ध रणजी स्पर्धेत पहिली संधी मिळाली.

विरार : एकेकाळी मुंबईच्या रणजी टीममध्ये (Ranji Team Mumbai) प्रवेशासाठी लाईन लावावी लागत होती, त्या काळात मुंबईपासून ६० मैलांवर असलेल्या विरारमधील आगाशी गावातील एका तरुणाने मात्र आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर अजित वाडेकरांच्या मुंबई संघात स्थान मिळवले. सुरेश देवभक्त हे त्यांचं नाव. 'दोदू' या नावाने मुंबईच्या क्रिकेट (Mumbai Cricket) विश्वात प्रसिद्ध असणारा दोदू हा वसई जिल्ह्यातील मुंबईतर्फे रणजी स्पर्धेत खेळणारा पहिला क्रिकेटपटू.

त्यांचं (Suresh Devabhakt Passed Away) आज वृद्धापकाळात निधन झाले, ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज दुपारी अंगाशी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर अनेक क्रीडापट्टूंनी त्यांचे अंत्य दर्शन घेतले. सुरेश देवभक्त यांच्या अंत्ययात्रेत आगाशीचे माजी सरपंच सुबोध पिंगळे, देवभक्त यांचे एकेकाळचे सहकारी वसंत मोरे, आनंद लेले सहभागी झाले होते. त्यांचा भाचा कविश कात्रे हा शेवट पर्यंत लक्ष देत होता.

मुंबईतील क्रिकेट मैदाने आपल्या घणाघाती फलंदाजीने आणि अचूक टप्प्यावरील ऑफ कटर्सने गाजवलेल्या या देवभक्तला बडोदे संघाविरुद्ध रणजी स्पर्धेत पहिली संधी मिळाली. त्या संघाचे कर्णधार अर्थातच अजित वाडेकर होते. दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर, सुनील गावसकर, अशोक मंकड, रामनाथ पारकर, मिलिंद रेगे, अजित नाईक, मेहता, अजित पै, पद्माकर शिवलकर, शरद हजारे, सुधीर नाईक, अब्दुल इस्माईल, महेश संपत, विजय कारखानीस, सुरेश तिगडी इत्यादी एकाहून एक मुंबईकर खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघात दोदू देवभक्त हा केवळ एकच खेळाडू उपनगरातला होता.

नॅशनल क्रिकेट क्लब यंग मेन्स क्रिकेट आणि नवरोझ क्रिकेट संघांतर्फे मुंबईतील स्थानिक स्पर्धांतून देवभक्तने अनेक चांगले पराक्रम केले. आंतरकॉलेज स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शतक आणि चार बळी घेत त्याने अंतिम सामन्यात रुईयाविरुद्ध ३५ धावा केल्या. प्रसिद्ध कांगा क्रिकेटमध्ये १०० बळी आणि १००० धावा करणारा तो वसईतला एकमेव क्रिकेटपटू ठरला होता.

हार्ड कॅसल वॉर्ड कंपनीतर्फे टाइम्स गटात खेळताना देवभक्तने बलाढ्य टाटाविरुद्ध ९६ धावा फटकावल्या होत्या. माजी कसोटीपटू सलीम दुराणीसह देवभक्तने पाचव्या विकेटसाठी १८७ धावांची भागीदारी केली होती. या दोघांच्या पराक्रमांच्या जोरावर हार्ड कॅसल कंपनीने मॅकेन्झी ढाल जिंकली होती. त्यानंतर सेंट्रल बँक आणि नंतर टाटा स्पोर्ट्स क्लबतर्फे खेळताना देवभक्तने अनेक पराक्रम केले. स्पष्टवक्तेपणासह क्षणोक्षणी विनोद निर्माण करण्यात दोदूचा हातखंडा होता, म्हणूनच वसईचा नागरिक असून तो खऱ्या अर्थाने मुंबईतल्या क्रिकेटपटूंच्या गळ्यातला ताईत बनला होता. कॉस्मोपॉलिटन ढाल क्रिकेट स्पर्धेत २०६ धावा फटकावून त्याने दिलीप सरदेसाईचा विक्रम मोडीत काढला होता.

सुरेश देवभक्त यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी सांगितले की, त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाची नव्या पिढीला इतकी माहिती नव्हती. त्यांच्या योगदानाची आम्हाला कल्पना आहे. त्यांचा सन्मान मोठ्या कार्यक्रमात करून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख नव्या पिढीला करून द्यायची होती. परंतु, त्यांच्या जाण्याणे ते आता मागे राहिले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनीही देवभक्त यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT