mumbai rivers in Thane district are flooded with algae administration failed to repair sakal
मुंबई

Mumbai Rivers Algae : ठाणे जिल्ह्यातील नद्यांना जलपर्णीचा विळखा; प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर ...

देसाई खाडी पुलाजवळ जलपर्णीची तयार झाली भिंत

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील नद्यांना जलपर्णीचा विळखा पडला असून हा विळखा सैल करण्यात जिल्हा प्रशासन मात्र अपयशी ठरले आहे. उल्हास नदी तसेच मलंगगड परिसरातून वाहत येणारे नदी पात्र, देसाई खाडी परिसर याठिकाणी देखील पाण्यावर जलपर्णीचा पूर्ण गालिचा पसरला आहे.

पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही जलपर्णी काढणे आवश्यक असून त्यासंबंधी केडीएमसी प्रशासनाने पहाणी देखील केली होती. तसेच जिल्हा स्तरावर स्थानिक आमदारांनी देखील पत्रव्यवहार केला होता.

मात्र जिल्हा प्रशासनाने ही बाब तेवढी गांभीर्याने घेतली नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी पत्रातील जलपर्णी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत येऊन जुन्या देसाई खाडी पुलाजवळ अडली आहे.

याठिकाणी जलपर्णी ची भिंतच तयार झाली असून ती हटवली नाही तर आजूबाजूच्या परिसरात पुरजन्य परिस्थिती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील नद्यांना जलपर्णीचा विळखा पडला आहे.

नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीला जलपर्णी मुक्त करण्यासाठी लाखोंचा निधी खर्च झाला पण नदी जलपर्णी मुक्त झाली नाही. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी देखील जलपर्णी मुक्त करण्यासाठी उल्हास नदी बचाव कृती समितीकडून पाठपुरावा सुरू आहे.

प्रशासन नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी उपाययोजना करते परंतु निधी खर्च होण्यापलीकडे काही प्रगती झालेली नाही.

उल्हास नदी प्रमाणेच मातली नदी, खोणी गावाजवळील नदी व देसाई खाडी पात्राला जलपर्णीने वेढले आहे. तसेच 27 गावातील लहान मोठ्या नाल्यांत देखील ही जलपर्णी पसरली असल्याने पुराचा धोका उदभवू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात सातत्याने पाऊस पडत आहे. पावसाच्या पाण्यामुळे नदी पात्रातील जलपर्णी पाण्यासोबत वाहून खाडीला मिळू पहात आहे. मात्र देसाई खाडीवरील जुन्या देसाई पुलाने या जलपर्णी ची वाट अडवली असल्याचे पहायला मिळत आहे.

या पुलाच्या खांबांना जलपर्णी अडकून त्या ठिकाणी जलपर्णी ची भिंतच तयार झाली आहे. या जलपर्णी च्या भिंतीमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी 27 गातील निळजे गाव यास पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

देसाईखाडी पात्रात जलपर्णीची वाढ होत असून ही जलपर्णी काढण्यात यावी यासाठी स्थानिक आमदार राजू पाटील यांनी जिल्हा प्रशासनास पत्रव्यवहार केला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी या जलपर्णीची पाहणी केली होती.

जलपर्णी काढण्यासाठी काही सामाजिक संस्था देखील पुढे आल्या होत्या. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी न दिल्याने जलपर्णी काढण्याचे काम काही झाले नाही.

शहर व ग्रामीण भागात पावसास सुरवात झाली आहे. नाले, गटारे यांची सफाई नीट न झाल्याने शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. नाले, गटार सफाई न झाली हे एक कारण असले तरी खाडी पात्रातील पाण्याची वाट जलपर्णीने अडवल्याने देखील हे पाणी शहरात घुसत होते असे बोलले जात आहे.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी नुकतीच देसाई खाडी परिसराची पहाणी केली. जुन्या देसाई खाडी पुलाजवळ जलपर्णी मोठ्या प्रमाणात अडकून पडली असून त्यामुळे पाण्याचा प्रवाह देखील अडला जात आहे. याविषयी जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. लवकरच जलपर्णी काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT