mumbai road debris sakal
मुंबई

Mumbai Road : मुंबईतील रस्ते होणार डेब्रिज मुक्त; कंत्राटदाराला २० वर्षांचे कंत्राट

मुंबईत जागोजागी इमारतीची बांधकामाचा राडोरोडा, या बांधकामातून निघणारे डेब्रिज रस्त्यावर, नाल्यात आदी ठिकाणी टाकण्यात येते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत जागोजागी इमारतीची बांधकामाचा राडोरोडा, या बांधकामातून निघणारे डेब्रिज रस्त्यावर, नाल्यात आदी ठिकाणी टाकण्यात येते.

मुंबई - मुंबईत जागोजागी इमारतीची बांधकामाचा राडोरोडा, या बांधकामातून निघणारे डेब्रिज रस्त्यावर, नाल्यात आदी ठिकाणी टाकण्यात येते. यामुळे मुंबईत धुळीचे कण पसरून प्रदूषण निर्माण होत असल्याने मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने रस्ते, मोकळ्या जागा डेब्रिजमुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे राडारोडा फेकणा-यांवर पालिकेची नजर राहणार आहे. यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामाचे २० वर्षाचे कंत्राट असून २१०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या सुशोभीकरण मोहिमेअंतर्गत सध्या रस्ते, उड्डाणपूल, स्कायवॉक, चौपाट्या, वाहतूक बेटे आणि चौकांचे सुशोभीकरण आणि रंगरंगोटी केली जात आहे. तसेच विविध रंगांची उधळण करणारी विद्युत रोषणाईही केली जात आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १,७०५ कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र, या सुशोभीकरण मोहिमेला बांधकामातून निघणाऱ्या डेब्रिजमुळे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत सध्या साडेतीन हजारहून अधिक बांधकामे सुरु आहेत. याच्यातून प्रतिदिन १२०० कोटी राडारोडा (डेब्रिज) तयार होतो. अनेकवेळा बांधकामांचा किंवा इतर तयार होणारा राडारोडा रस्ते, चौक, उद्याने व मोकळ्या जागांवर अवैधपणे फेकला जातो. यामुळे मुंबईत अस्वच्छता निर्माण होऊन शहर प्रदूषित होते व याचा आरोग्याला धोका निर्माण होतो.

बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार प्रक्रिया व विल्हेवाटीची सुविधा निर्माण करणे अनिवार्य आहे. बेवारस राडा रोड्यास अटकाव करण्यासाठी तसेच वैध पद्धतीने निष्काषित करण्याचे पालिकेने ठरवले आहे. यासाठी कंत्राटदार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या एकात्मिक प्रकल्पांतर्गत शहराला दोन गटात विभागले आहे. गट अ मध्ये शहर व पूर्व उपुनगरातील १५ प्रशासकीय विभाग व गट ब मध्ये पश्चिप उपनगरांत ९ प्रशासकीय विभाग यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही गटांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. या दोन्ही संस्थांनी ६०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प ५ एकर जागेवर उभारून २० वर्षांसाठी तो चालवायचा आहे.

पालिकेने २० वर्षांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. पालिकेने यासाठी मेसर्स टंडन अर्बन सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांना सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. राडा रोडा विल्हेवाटीसाठी पालिकेने २०१७ पासून कंत्राटदार नेमण्याची प्रयत्न सुरु होते. मात्र निविदेला अल्प प्रतिसाद मिळत होता शिवाय अनेक टेक्निकल गोष्टींमुळेही अनेक निविदा रद्द करण्यात आल्या. अखेर आता कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आल्याने डेब्रिजमुक्त मुंबई करण्याच्यादृष्टीने पालिकेने पाऊल उचलले आहे.

पालिकेचे २० वर्षासाठी कंत्राट

दररोजचा ६०० मेट्रिक टन रा़डारोडा उचलण्यासाठी - १,४२५ प्रती मेट्रिकटन प्रमाणे एक वर्षासाठी ३१ कोटी २० लाख ७५ हजार रूपये पालिका पहिला वर्षी मोजेल. त्यानंतर दुस-या वर्षापासून ५ टक्के वाढ करून २० वर्षात १०३१ कोटी ८९ लाख ९३ हजार ११० निर्धारित करून लघुत्तम प्रतिसादात्मक निविदाकार मे. मेट्रो हँन्डलिंग प्रायव्हेट लि. याला २० वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे.

तर आणखी एका निविदेचा भाग म्हणून पालिकेकडून रोज ६०० मेट्रिक टन रा़डारोडा उचलण्यासाठी - १०४१ प्रती मेट्रिकटन प्रमाणे एक वर्षासाठी ३० कोटी ९८ लाख ८५ हजार रूपये मोजण्यात येणार आहेत. तर दुस-या वर्षापासून ५ टक्के वाढ करून २० वर्षात एक हजार २४ कोटी ६६ लाख ५५ हजार २२० रुपयांचे काम एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. याला २० वर्षासाठी काम देण्यात आले आहे. या दोन्ही कंत्राटाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. दरम्यान ही हजारो कोटी रुपयाची रक्कम एकदाच न देता दरवर्षी ३० ते ३२ कोटी रुपये देण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT