School Sakal media
मुंबई

मुंबईतील शाळा लांबणीवर पडण्याची शक्यता; पालकांना ओमिक्रॉनची धास्ती

संजीव भागवत

मुंबई : मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (Mumbai School) १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने (Bmc education authorities) घेतला होता. मात्र ठाणे जिल्ह्यात (thane) ओमिक्रॉनचा रुग्ण (Omicron Patient) सापडल्याने मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर (school may starts later) पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व शाळा या १ डिसेंबरपासून सुरू झालेल्या आहेत. मात्र ओमिक्रॉनची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुंबई महापालिका शिक्षण विभागाने मुंबई आणि परिसरातील शाळा या १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आता मुंबईच्या वेशीवरच ओमिक्रॉनचा एक रुग्ण सापडला असल्याने शहरात लवकरच आणखी कडक निर्बंध लादले जातील, यामुळे पहिली ते सातवीपर्यंच्या शाळा सुरू होणे कठीण असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

"युरोपिय देशात ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा अहवाल समोर आला आहे. शाळा सुरू झाल्यास त्याचा मोठा फटका आमच्या मुलांना बसू शकेल. यामुळे आम्ही शाळांमध्ये मुलांना पाठविण्यासाठी कोणतीही संमती देण्यासाठी विचार करू. शाळा सुरू केल्या तर काही झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी."
- ॲड. अनुभा सहाय, पदाधिकारी, इंडिया वाईड पेरेंट असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack: 9 वर्षाची सर्वात लहान साक्षीदार... कसाबच्या विरोधात कोर्टात दिली होती साक्ष! कोण आहे ती मुलगी

Weather today : राज्यात गारठा वाढला, किमान तापमान 9.6 अंशांवर, उत्तरेतील थंडीच्या लाटेमुळे पारा आणखी घसरणार

Shaktikanta Das: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती खालावली, चेन्नईच्या रुग्णालयात दाखल

Share Market Opening: भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत; बँकिंग-आयटी शेअर्समध्ये जोरदार वाढ

PAN 2.0 Project: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; करदात्यांना QR कोड असलेले नवीन पॅन कार्ड देणार

SCROLL FOR NEXT