Shri Family Guide Program Esakal
मुंबई

Shri Family Guide: ‘श्री फॅमिली गाईड’ संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शक, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची भावना

सकाळ’चा ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रम केवळ एका व्यक्तीच्या हिताचा नसून, त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबासाठी दिशादर्शक आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्यात सहभागी झाले पाहिजे, असे मत आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी व्यक्त केले.

सकाळ डिजिटल टीम

Paduka Darshan Sohala: ‘सकाळ’चा ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रम केवळ एका व्यक्तीच्या हिताचा नसून, त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबासाठी दिशादर्शक आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्यात सहभागी झाले पाहिजे, असे मत आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी व्यक्त केले. याशिवाय ‘सकाळ’ने २६ आणि २७ मार्च रोजी आयोजित केलेल्या ‘श्रीगुरू पादुका दर्शन’ सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुरुदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी उपस्थितांनी केले.

‘सकाळ’च्या श्री फॅमिली गाईड उपक्रमांतर्गत २६ आणि २७ मार्च रोजी मुंबईच्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा आयोजित केला आहे. या महोत्सवात १८ संत-महंतांच्या पादुका दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येईल. त्यानिमित्ताने ‘सकाळ’ कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सहभागी साधकांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी मालवीयनगर येथील श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष अजय खोलापूरकर, गजानन महाराज उपासना केंद्र, माधवनगर येथील जयंत वेलणकर, गजानन विजय ग्रंथ सुश्राव्य संगीत पसायदानचे निर्माते विनोद वखरे, अजय अंजीकर, राजेश महाजन आणि दिगंबर जैन महासभेचे विदर्भ अध्यक्ष सतीश जैन पेंढारी उपस्थित होते.(Latest marathi News)

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण धावतोय. विद्यार्थी यशासाठी, तरुण वर्ग करिअरसाठी, चाकरमानी अर्थार्जनासाठी, गृहिणी कुटुंबासाठी तर ज्येष्ठ समाधान मिळविण्यासाठी धडपडतोय. याच धडपडीतून मार्ग काढत स्वस्थ आणि सुदृढ जीवनशैली मिळविण्याचे गमक श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून मिळणार असल्याने प्रत्येकाने सहभागी व्हावे, असा हा उपक्रम असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

‘आलेल्या संधीचा लाभ घ्या’

‘श्री फॅमिली गाईड’च्या माध्यमातून तब्बल १८ संत-महंतांच्या पादुका दर्शनाचा लाभ घेण्याचा दुर्मीळ योग २६ आणि २७ मार्चला जुळून आला आहे. नवी मुंबईच्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा होणार आहे. (Latest marathi News)

अध्यात्माची ही पर्वणीच असल्याने या दुर्मीळ संधीचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित साधकांनी केले. बरेचदा इच्छा असूनही, आपण तीर्थस्थळी जाऊ शकत नाही, त्यामुळे या सोहळ्यात सहभागी होऊन अनेक तीर्थस्थळांच्या दर्शनाचे पुण्य पदरी पाडता येईल, अशा भावनासुद्धा यावेळी व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT