भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून दाखवून आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या बहाण्याने गायकाला अडीच लाखची फसवणूकी प्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी गोव्यातून अटक केली.
मुंबई - भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून दाखवून आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या बहाण्याने गायकाला अडीच लाखची फसवणूकी प्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे.
आरोपींनी ऑक्टोबरमध्ये गायक अशोक अर्जुन निकाळजे यांच्याशी आयपीएस अधिकारी म्हणून संपर्क साधला आणि त्यांना कर्नाटकातील बेळगाव येथे एका कार्यक्रमात कला सादर करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी पिडीत अशोक निकाळजे यांना या कार्यक्रमासाठी प्रवीण दस्ती यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. प्रवीण दस्ती यांनी निकाळजे यांना त्यांच्या खात्यात अडीच लाख रुपये जमा करण्यास सांगितले, जे नंतर परत करण्यात येतील असे आश्वासन दिले . या वर विश्वास ठेवत पिडीत गायकाने व्यवहार केला. या व्यवहारानंतर, आरोपीने त्याचे कॉल टाळण्यास सुरुवात केली आणि काही वेळा संपर्क झाला तेव्हा कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगितले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निकाळजेनी टिळक नगर पोलिसांशी संपर्क साधला आणि गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तपास सुरू केला. ऑनलाइन व्यवहाराच्या आधारे रविवारी गोव्यातून आरोपींना अटक करण्यात आली. ज्या खात्यात पैसे जमा करण्यात आले ते गोव्यातील एका टॅक्सी चालकाचे होते. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार फसवणूक करणे आणि इतर आरोपी नुसार गुन्ह्यांची नोंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.