- नितीन बिनेकर
मुंबई : रेल्वे प्रवासात महिलांची छेडछाड, विनयभंग, चोरीच्या उद्देशाने मारहाण असे गुन्हे घडतात. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्वचं लोकल गाड्यांचा महिला डब्यात सीसीटीव्ही आणि टॉक बॅक यंत्रणा बसविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, अजूनही अनेक लोकल गाड्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाही.
बुधवारी धावत्या लोकलमध्ये एका तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेनंतर लोकलच्या महिला डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील लोकलने दररोज लाखो महिला प्रवास करतात. गर्दीची वेळ असो वा शुकशुकाट, चोरी, चेन स्नॅचिंग, छेडछाड यासारख्या गुन्ह्यांनी महिला त्रस्त आहे. यासाठी महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे, टॉक बॅकप्रणाली यंत्रणा लावण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले होते.
काही महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र, ही मोहीम संथ गतीने सुरु असून अनेक महिला डब्बात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले नसल्याचे चित्र आहे. टॉक बॅक यंत्रणा दोन ते तीन लोकलमध्ये बसवली गेली आहे. सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची मोहीम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकात ३ हजार ४३२ सीसीटीव्ही कार्यरत आहे. तर रेल्वे गाड्यात १, ८१० सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत आहे. विशेष म्हणजे १८१० पैकी १३५० सीसीटीव्ही कॅमेरे लोकल गाड्यात बसविण्यात आले आहे. यात सीमेस लोकलमध्ये २४० "मेधा" लोकलमध्ये ३३२, बंबार्डियन लोकलमध्ये ७२६ आणि वातानुकूलित रेल्वे गाड्यात ७२ सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहे.
प्रशासनाला या संदर्भात आम्ही अनेकदा निवेदन दिले आहे. रेल्वे सल्लागार समितीत हा विषय ठेवला, काही वर्षापुर्वी संसदेची महिला सुरक्षा समिती मुंबईत आली होती. या समितीपुढेही महिला सुरक्षेचा प्रश्न आम्ही उपस्थित केला.मात्र तरीही महिला डब्बांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱे बसवण्याची प्रक्रीया अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा आहे.
सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.