मुंबई : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्याकडील माहिती केवळ प्रसार माध्यमांसोबत उघड करुन वेळ घालविण्यापेक्षा ती महत्त्वाची माहिती संबंधित तपास यंत्रणाकडे द्यावी. जेणेकरुन त्या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने होऊ शकेल, असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.
क्रुझवरील कारवाईमध्ये दहा लोकांना पकडलं होते. मात्र त्यापैकी दोन लोकांना सोडण्यात आले. त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असल्याची सविस्तर माहिती उद्याच्या पत्रकार परिषदेत देणार असल्याचे नवाब मलिक यांनी आज जाहिर केले. त्यासंदर्भात दरेकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
मलिक यांच्या वक्तव्यामध्ये काही तथ्य दिसत नाही. जर मलिक यांच्या दाव्यानुसार पकडण्यात आलेल्यांमध्ये जर कोणत्या पक्षाच्या नेत्याचा नातेवाईक असेल तर एनसीबी त्या विरुध्द नक्कीच कारवाई करेल. तरीही मलिक यांच्याकडे काही ठोस पुरावे असतील तर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत जास्त वेळ घालविण्यापेक्षा त्या संबंधित तपास यंत्रणेकडे तक्रार करावी आणि त्यांना माहिती द्यावी. जेणेकरुन तपास योग्य पध्दतीने होईल व संबंधितांविरुध्द कारवाई होऊ शकेल, असेही दरेकर यांनी सुनावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.