South Central Mumbai Lok Sabha Result : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात अनिल देसाईंना महत्वाची आघाडी मिळाली आहे. यावेळी ते ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत.यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र आजुन आधिकृत घोषणा बाकी आहे. राहूल शेवाळेंना 3 लाख 39 हजार 828 मतं मिळाली आहेत. तर अनिल देसाई 3 लाख 93 हजार 342 मतं मिळाली
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेतून बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत 13 खासदार आले. त्या खासदारांचं नेतृत्व करणारे खासदार म्हणजेच राहुल शेवाळे. राहुल शेवाळे हे गेल्या दोन टर्म पासून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.
या ठिकाणी त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे यंदाची लढत ही खूप रंगतदार आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होणार आहे. या ठिकाणी ५३.६० टक्के इतके मतदान झाले.
2004 पासून ते 2019 पर्यंत 2009 ही निवडणूक सोडली तर या ठिकाणी शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. शिवसेना नक्की निवडून येणार असेच चित्र या ठिकाणचं आहे. 2019 साली राहुल शेवाळे या ठिकाणी १ लाख ५२ हजार मतांनी निवडून आले होते.
त्यावेळी त्यांनी एकनाथ गायकवाड म्हणजेच वर्षा गायकवाड यांचा वडिलांचा या ठिकाणी पराभव केला होता. काँग्रेसने एकनाथ गायकवाड यांना 2019 आली उमेदवारी दिली होती आणि त्यांना दोन लाख 72 हजार 774 मतं मिळाली होती.
धारावी, वडाळा ते चेंबूर मुंबईतला जो कष्टकरी वर्ग आहे तो या मतदारसंघात राहतो. यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असतंच. कारण मुंबईचा कष्टकरी कोणासोबत हे या मतदारसंघामुळे समजतं. या ठिकाणी मराठी, हिंदी, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय असे सर्वच मतदार एकत्र आहेत.
त्यातही मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय लोक या ठिकाणी राहतात. राहुल शेवाळे यांच्या विरोधात जर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली असती तर काँग्रेस या ठिकाणी नक्की निवडून आली असती अशी चर्चा आहे. मात्र असं जरी असलं तरी देखील अनिल देसाई यांचा प्रचारही मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडी करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.