Mumbai - ऑरेंज गेट- मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाच्या मुंबईतील नागरी बांधकाम कामासाठी एल अँड टी हे सर्वात कमी बोली लावणारे ठरले आहेत. ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह हे अंतर काही मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून भुयारी बोगदा बांधण्यात येणार आहे. ३.८ किमी लांबीच्या या प्रकल्पात दुहेरी बोगदे असतील.
पूर्व द्रुतगती मार्गावरून कोस्टल रोडला जोडण्यासाठी आणि जलद वाहतुकीसाठी एमएमआरडीएने हा भुयारी मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रत्येक बोगद्यामध्ये प्रत्येकी ३.२ मीटर रुंद दोन लेन असतील (अधिक आपत्कालीन लेन) आणि या मार्गाचा वेग ८० किमी प्रतितास असेल.
प्रकल्प आराखड्यानुसार, मार्गरेषा पूर्व मुक्त मार्गाच्या ऑरेंज गेट पासून चिंचबंदर रेल्वे ओलांडणी पुलाच्या पूर्वेकडून सुरु होते व सरदार वल्लभभाई पटेल या रस्त्यावरुन हार्बर व मध्य रेल्वेमार्ग ओलांडून, मोहम्मद अली रस्ता ओलांडून,
पठ्ठे बापूराव मार्ग ( अलंकार सिनेमा चौक), राजा राजमोहन रॉय मार्ग, (हरकिसन नरोत्तमदास हॉस्पिटल), तसेच विठ्ठलभाई पटेल रस्ता, लॅमिंग्टन रोड, न्यू क्वीन रस्ता, पश्चिम रेल्वेवरील वरेकर रेल्वे पुल इ. रस्ते ओलांडून नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग (मरिन ड्राईव्ह) येथे सागरी किनारा मार्गाच्या दरम्यान अशी प्रस्तावित आहे.
एमएमआरडीएला या प्रकल्पासाठी अंदाजे ६,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ता. २० जुलै रोजी या प्रकल्पासाठी आर्थिक निविदा उघडण्यात आल्या. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या होत्या. यामध्ये दोन कंपन्या स्पर्धेत आहेत.
ज्यात एल अँड टी आणि जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स यांचा समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे ७,७६५ कोटी आणि ८,५८९ कोटी रुपये इतकी बोली लावली आहे. यात एल अँड टीने सर्वात कमी बोली लावली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.