Mumbai News  
मुंबई

Mumbai News : २० गिधांडांचे यशस्वी स्थलांतरण; भोपाळमधील गिधाडे पिंजोर प्रजनन संवर्धन केंद्रात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वीस गिधाडांना भोपाळ, मध्यप्रदेश येथून पिंजोर, हरियाणा येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे. वन विहार, मध्य प्रदेश सरकार आणि हरियाणाचे वन विभाग यांच्या सहकार्याने हे स्थलांतरण करण्यात आले. सेंट्रल झू ऑथॉरिटी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)च्या शास्त्रज्ञांची टीम ज्याचे नेतृत्व डॉ. रोहन शृंगारपुरे आणि निकिता प्रकाश यांनी केले होते.

अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) शुभरंजन सेन, आणि वन विहार राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका पद्मप्रिया बालकृष्णन यांनी संरक्षण प्रजनन केंद्रात वीस गिधाडांना पक्षीगृहात सोडले. बीएनएचएसचे देशभरात चार गिधाड प्रजनन केंद्र आहेत. पिंजोरमध्ये हरियाणा सरकार, भोपाळमध्ये मध्य प्रदेश सरकार, राजाभटखवामध्ये पश्चिम बंगाल सरकार आणि राणी कारवाहाटीमध्ये आसाम सरकार यांच्या भागीदारीत देशभरात चार गिधाड संवर्धन केंद्रे आहेत.

२००४ पासून पर्यावरण मंत्रालयाच्या सहकार्याने बीएनएचएसने संबंधित राज्यांचे पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, संबंधित राज्य सरकार आणि रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स यांच्या बरोबरीने ७०० गिधांडांचे संवर्धन केले आहे. भोपाळ येथील प्रजनन संवर्धन केंद्राची स्थापना २०११ मध्ये वन विहार येथे करण्यात आली.

येथे ‘ओरियंटल व्हाइट बॅक’ - पांढर्‍या पाठीची गिधाडे आणि दुसरी ‘इंडियन’ किंवा ‘लाँगबिल्ड’ - लांब चोचीच्या गिधाडांचे यशस्वीरित्या प्रजनन करण्यात आले. पिंजोरमधील या वीस गिधाडांमुळे हरियाणा केंद्रातील गिधाडांचा प्रजननसाठा आणखी मजबूत होईल आणि या गिधाडांची संख्या वाढण्यास हातभार लागेल.

बीएनएचएसचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी बीएनएचएसच्या या महान कामगिरीबद्दल गिधाड संवर्धन कार्यक्रम टीमचे आणि जटायू संवर्धनासाठी सतत प्रयत्न केल्याबद्दल मध्यप्रदेश आणि हरियाणा सरकारचे अभिनंदन केले.

बीएनएचएसचे अंतरिम संचालक आणि मानद सचिव किशोर रिठे यांनी बीएनएचएस शास्त्रज्ञांच्या टीमचे, वन विहार, मध्य प्रदेश आणि हरियाणा सरकारचे २० गिधाडांचे यशस्वी स्थलांतर केल्याबद्दल अभिनंदन केले. भोपाळचे हे केंद्र मध्यप्रदेश आणि भारतात जटायू संवर्धन आणि प्रजननाच्या प्रयत्नांमध्ये यापुढेही महत्त्वपूर्ण योगदान देईल, असेही ते म्हणाले.

गिधाडांचे निसर्गातील महत्व

निसर्गाची साफसफाई करणारी गिधाडे आपण वर्षानुवर्षे पाहत होतो. एखाद्या गावात मृत जनावर गावाबाहेर टाकल्यावर तिथे काही तासांतच मोठ्या संख्येने गिधाडे येतात. काही तासांत ते जनावराचे मांस साफ करून टाकत. हेच काम भटकी कुत्री आणि जंगली जनावरेसुद्धा करतात; पण हे काम करण्याची त्यांची क्षमता गिधाडांच्या तुलनेत फारच कमी असते. गिधाडे अतिशय उंचावर सतत घिरट्या घालत फिरत असतात आणि इतक्या उंचावरून या गिधाडांना रानात, माळावर पडलेल्या मृतदेहांचा पत्ता अचूकपणे लागतो आणि बघताबघता ती त्या ठिकाणी सर्वांत प्रथम हजर होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT