मुंबईः मुंबईतील प्रमुख कापड मार्केट म्हणजे काळबादेवी परिसरातील स्वदेशी मार्केट,एम.जे.(मूलजी जेठा) मार्केट आणि मंगलदास मार्केट. जुलैमध्ये हा बाजार उघडला. मात्र सुरुवातीला कोरोनाच्या भितीने कपडा खरेदीला ग्राहक येतच नव्हते. त्यामुळे गणेशोत्सव,नवरात्री उत्सव आणि रमजान ईद सणाच्या काळात केवळ 10 टक्केच्या आसपास कापडाची विक्री झाल्याने व्यापारी चिंतेत होते. मात्र दिवाळी जवळ येताच बाजाराने वेग धरला असून इथला व्यापार आता 40 टक्के पर्यंत पोहोचला आहे. मुंबईच्या विविध भागातून कापड खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी व्हायला लागली आहे.
या बाजारात जवळपास 700 सिंथेटिक कापड होलसेलर्स व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. साडी, चूडीदार, पंजाबी ड्रेसेस तसेच अन्य विविध पारंपरिक पोशाखांची होलसेल दुकाने सजलेली आहे. देशभरातील प्रमुख कापड मिल, फॅक्टरी, हँड लूम इथून या बाजारात माल येतो. अगदी चीन, कोरिया, जपान आणि काही अन्य देशातून या बाजारात माल येतो. देशभरातील प्रमुख बाजारपेठेत हा माल जातो. मात्र सध्या आवक घटलेली आहे.
लॉकडाऊनमुळे चार महिने व्यापार बंद होता. कोरोनामुळे जगभरात कापड व्यापार मंदीत आहे. मात्र आम्ही व्यापारात संधी शोधण्याचा प्रयत्न करतोय अस स्वदेशी मार्केट मर्चन्ट असोसिएशन सचिव सुधीर शाह यांनी म्हटलंय. गणेशोत्सव, नवरात्र आणि ईद बाजारात अवघा 10 टक्केच व्यापार झाला. लोकांचा रोजगार बुडालाय आता जर बाजार पुन्हा उभ राहायचे असेल रेल्वे, विमानसेवा आणि जलवाहतूक सुरु व्यायला हवी. सर्वांसाठी लोकल सुरु झाल्यास मुंबईत व्यापार जगेल. सध्या देश भरातून छोटे मोठे व्यापारी माल खरेदीला येत नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सर्वत्र मोबाईल फोनवर व्यापार सुरु आहे. मात्र कपडा प्रत्यक्ष हाताने कापड पहावे लागते त्याची प्रॉपर्टी पहावी असही ते म्हणाले.
लोकलमुळे अडचणी
विरार, कर्जत, कसारा, कल्याण, पनवेल, वाशी येथून छोट्या व्यावसायिकांना तसेच सामान्य ग्राहकांना दक्षिण मुंबईत येण्यास लोकल हा महत्त्वाचा पर्याय आहे. मात्र लोकल सुरु न झाल्यामुळे एसटी आणि खासगी बसेसचा पर्याय परवडत नाही. त्याचा परिणामही कापड खरेदी विक्रीवर पडला आहे. दुसरीकडे लोकल सुरु न झाल्याचा परिणाम व्यापारी, दुकानातील कर्मचारी, मजूर, कामगारांवरही पडला आहे.
आम्ही दीपाळीसाठीच्या कापड खरेदीस आलोय. काही ड्रेस मटेरियल कापड घेतलय मार्केटची रंगत पूर्वी सारखी काही जाणवत नाही. तसेच यंदा नवीन डिझाइन्सचे तसेच वेगळ्या पद्धतीचे कापड़ उपलब्ध आहेत का जसे वूल मिक्स कॉटन, टेरीकॉट, सिंथेटिक, क्रेफ, चिकन, लिनन शोधतोय मिळाल्यास खरेदी करणार आहोत.
अर्चना गवई, ग्राहक
--------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Mumbai textile market struggles with recession Diwali market is recovering turnover of 10 per cent to 40 per cent
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.